शेतकऱ्यांना माओवादी संबोधणे ही तर ‘मनु’वृत्ती!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 13, 2018 06:06 AM2018-03-13T06:06:21+5:302018-03-13T06:06:21+5:30

आदिवासी शेतक-यांना ‘नक्षलवादी’, ‘माओवादी’ म्हणणे ही अतिशय निषेधार्थ असून, यातून भाजपाचे मनुवादी स्वरूप समोर आले आहे.

Manu Vrutva is called 'Manuval' for farmers! | शेतकऱ्यांना माओवादी संबोधणे ही तर ‘मनु’वृत्ती!

शेतकऱ्यांना माओवादी संबोधणे ही तर ‘मनु’वृत्ती!

googlenewsNext

मुंबई : आदिवासी शेतक-यांना ‘नक्षलवादी’, ‘माओवादी’ म्हणणे ही अतिशय निषेधार्थ असून, यातून भाजपाचे मनुवादी स्वरूप समोर आले आहे. भाजपाच्या पोटात काय आहे, हे या निमित्ताने शेतकºयांना कळले आहे, अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते जयंत पाटील यांनी केली.
भाजपा युवा मोर्चाच्या अध्यक्षा पूनम महाजन यांनी किसान लाँग मार्चमधील शेतकºयांना ‘नक्षलवादी’, ‘माओवादी’ अशा स्वरूपाचे शब्द वापरले असल्याचे कळताच, जयंत पाटील यांनी त्याबद्दल तीव्र नाराजी व्यक्त केली. महाजन यांनी जे वक्तव्य केले, ते मनुवादी वृत्तीचे उत्तम उदाहरण आहे. १८० किमीचा प्रवास करून ते शेतकरी आपल्या न्याय हक्कासाठी मुंबईत पोहोचले आहेत, परंतु महाजन यांनी या लढ्याला शहरी नक्षलवादी आणि माओवादी असे रंग देणे हे स्पष्ट करते की, भाजपाची शेतकºयांप्रती काय आस्था आहे. शेतकºयांबाबत यांच्या मनात किती द्वेषभावना आहे, हे यातून स्पष्ट होते, असे पाटील म्हणाले.

Web Title: Manu Vrutva is called 'Manuval' for farmers!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.