मापाची नोंदणी बंधनकारक

By admin | Published: December 22, 2014 02:43 AM2014-12-22T02:43:09+5:302014-12-22T02:43:09+5:30

विकासकाने करारात नमूद केलेल्या चटईक्षेत्राची स्वतंत्र तपासणी करण्यासाठी नागरिकांना आता स्वतंत्र पर्याय उपलब्ध झाला

Mandatory registration binding | मापाची नोंदणी बंधनकारक

मापाची नोंदणी बंधनकारक

Next

चेतन ननावरे, मुंबई
विकासकाने करारात नमूद केलेल्या चटईक्षेत्राची स्वतंत्र तपासणी करण्यासाठी नागरिकांना आता स्वतंत्र पर्याय उपलब्ध झाला आहे. शासनाच्या वैध मापनशास्त्र विभागाने पुढाकार घेत विभागाच्या प्रमाणपत्राशिवाय शासनाच्या जिल्हा सह निबंधकांनी कोणत्याही भूखंड किंवा सदनिकेच्या खरेदी खतांची नोंदणी करू नये, असे फर्मान काढले आहे. सध्यातरी या आशयाचे पत्र मुंबई उपनगरचे सह जिल्हा निबंधक आणि कोकण विभागाचे दुय्यम निबंधकांना धाडण्यात आले आहे.
नियमानुसार कोणत्याही भूखंड, जमीन किंवा सदनिकांच्या खरेदी किंवा विक्री व्यवहारात खरेदी खतांची नोंदणी ही एकर किंवा चौ.मीटरमध्ये नमूद करणे गरजेचे आहे. मात्र आतापर्यंत खरेदी खतांत चौरस फुटामध्ये मोजणी करण्यात येत होती. त्यामुळे यापुढे नोंदणी करताना चौ.मी. किंवा एकरमध्ये करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. शिवाय नमूद क्षेत्रफळाची मोजणी कोणत्या मालकाने केली, त्यासाठी वापरलेली वजने मापे प्रमाणित केलेली होती किंवा नाही आणि ती वजने मापे यांची वैध मापनशास्त्र विभागाकडून तपासणी झालेली होती का, याची खातरजमा करावी लागणार आहे. त्यामुळे सह जिल्हा निबंधकांना यापुढे बिल्डरकडून या विभागाच्या परवानगीचे प्रमाणपत्र तपासावे लागणार आहे. तसे न केल्यास संबंधित सह जिल्हा निबंधकांवर गुन्हा दाखल करणार असल्याची माहिती पाण्डेय यांनी दिली आहे.

Web Title: Mandatory registration binding

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.