‘त्या’ परिचारिकांच्या कुटुंबीयांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करा!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 14, 2019 06:06 AM2019-04-14T06:06:19+5:302019-04-14T06:06:23+5:30

हिमालय पूल दुर्घटनेत गोकुळदास तेजपाल रुग्णालयातील तीन परिचारिकांचा मृत्यू ओढावला होता.

Make those 'nesters' financially financially! | ‘त्या’ परिचारिकांच्या कुटुंबीयांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करा!

‘त्या’ परिचारिकांच्या कुटुंबीयांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करा!

Next

मुंबई : हिमालय पूल दुर्घटनेत गोकुळदास तेजपाल रुग्णालयातील तीन परिचारिकांचा मृत्यू ओढावला होता. त्यात अपूर्वा प्रभू, भक्ती शिंदे आणि रंजना तांबे यांचा समावेश आहे. या दुर्घटनेतील जखमी वा मृत कुटुंबीय अजूनही मदतीपासून
वंचित आहेत. मात्र या परिचारिकांच्या कुटुंबीयांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी त्यांची जबाबदारी घ्यावी, अशी मागणी महाराष्ट्र नर्स फेडरेशनच्या माध्यमातून परिचारिकांनी केली आहे. या तिघींच्या मृत्यूमुळे रुग्णालयावर शोककळा पसरली होती. रात्री ड्युटीवर जाताना
या तिघी दुर्घटनेचा बळी ठरल्या होत्या.
तिघींचीही कुटुंबे आर्थिकदृष्ट्या त्यांच्यावर अवलंबून होती. त्यामुळे या परिचारिकांचे कुटुंब सक्षम करण्यासाठी प्रशासनाने त्यांची जबाबदारी घ्यावी, असे फेडरेशनने आपल्या पत्रात म्हटले आहे.
अपूर्वा यांना दोन तर भक्ती यांनादेखील दोन अपत्ये आहेत. अविवाहित रंजना या आईसोबत राहायच्या. त्यामुळे केवळ पाच लाखांची मदत न करता त्यांच्या कुटुंबातील सदस्यांना रुग्णालयात नोकरी द्यावी, असेही पत्रात नमूद आहे.
नर्स फेडरेशनच्या सुमन टिळेकर यांनी याविषयी सांगितले की, तिन्ही परिचारिकांची सेवा १० ते १२ वर्षे झाली होती. त्यामुळे केवळ पैशांच्या मदतीऐवजी त्यांच्या कुटुंबातील सदस्यांना नोकरीसाठी विचार केला तर त्यांच्या कुटुंबाचे भविष्य अधिक सुकर होईल.

Web Title: Make those 'nesters' financially financially!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.