मोबाइल ‘स्कॅन’ करा, लोकलचे तिकीट मिळवा; प्रवाशांची रांगेतून सुटका होणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 12, 2018 02:12 AM2018-01-12T02:12:48+5:302018-01-12T02:12:55+5:30

उपनगरीय स्थानकांवरील प्रवाशांच्या सोईसाठी मध्य रेल्वेने २४ मोबाइल तिकीट वेंडिंग मशीन कार्यान्वित केल्या. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनससह घाटकोपर, ठाणे, डोंबिवली, कल्याण स्थानकांवर या मशीन बसविण्यात आल्या आहेत. मोबाइल तिकिटांमुळे प्रवाशांची रांगेतून सुटका होणार आहे.

Make 'Scan' Mobile, Get Local Tickets; Passengers will be released from the queue | मोबाइल ‘स्कॅन’ करा, लोकलचे तिकीट मिळवा; प्रवाशांची रांगेतून सुटका होणार

मोबाइल ‘स्कॅन’ करा, लोकलचे तिकीट मिळवा; प्रवाशांची रांगेतून सुटका होणार

googlenewsNext

मुंबई : उपनगरीय स्थानकांवरील प्रवाशांच्या सोईसाठी मध्य रेल्वेने २४ मोबाइल तिकीट वेंडिंग मशीन कार्यान्वित केल्या. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनससह घाटकोपर, ठाणे, डोंबिवली, कल्याण स्थानकांवर या मशीन बसविण्यात आल्या आहेत. मोबाइल तिकिटांमुळे प्रवाशांची रांगेतून सुटका होणार आहे.
वाढत्या शहरीकरणामुळे उपनगरीय लोकलच्या प्रवासी संख्येत वाढ होत आहे. यामुळे स्थानकांवर तिकिटांसाठी लांबच लांब रांगा दिसतात. रांगेतून प्रवाशांची सुटका होण्यासाठी मध्य रेल्वेने २४ मोबाइल तिकीट वेंडिंग मशीन बसवल्या आहेत. मशीनमध्ये मोबाइल स्कॅन करून काही सेकंदांत तिकीट प्रवाशांना मिळणार आहे. सीएसएमटी येथे ४ मोबाइल तिकीट वेंडिंग मशीन बसविण्यात आल्या आहेत. तर घाटकोपर, ठाणे, डोंबिवली, कल्याण स्थानकांवर प्रत्येकी ५ मोबाइल तिकीट वेंडिंग मशीन सुरू करण्यात आल्या आहेत, अशी माहिती मध्य रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी सुनील उदासी यांनी दिली.
उपनगरीय लोकल प्रवाशांना लोकल तिकिटांसाठी तिकीट खिडकी, एटीव्हीएम, स्मार्ट कार्ड, अधिकृत एजंट यांसह आता मोबाइल तिकीट वेंडिंग मशीनमधूनदेखील तिकीट घेता येणार आहे.
वेळ वाचणार
यूटीएस मोबाइल अ‍ॅपद्वारे तिकीट बुक करणाºयांना तिकिटाचे प्रिंटआऊट हवे असेल तर मोबाइलवर प्राप्त होणारा बुकिंग आयडी आणि मोबाइल क्रमांक एटीव्हीएमवर टाकणे अनिवार्य होते. ही प्रक्रिया वेळखाऊ होती. मात्र एमटीव्हीएमवर थेट मोबाइल स्कॅन करून त्वरित तिकीट मिळेल. यामुळे प्रवाशांचा वेळ वाचून रांगेतून सुटका होणार आहे.

पश्चिम रेल्वेवर २० एमटीव्हीएम
पश्चिम रेल्वेनेदेखील २० मोबाइल तिकीट वेंडिंग मशीन प्रवाशांसाठी खुल्या केल्या आहेत. चर्चगेटसह दादर, वांद्रे, अंधेरी आणि बोरीवली या स्थानकांवर ही एमटीव्हीएम सुविधा सुरू करण्यात आली आहे.
यूटीएस अ‍ॅपच्या मदतीने तिकीट बुक करून स्थानकांवरील या मशीनच्या साहाय्याने तिकीट घेता येणार असल्याची माहिती पश्चिम रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी रवींद्र भाकर यांनी दिली.

Web Title: Make 'Scan' Mobile, Get Local Tickets; Passengers will be released from the queue

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.