'सासूमुळे वाटणी झाली, सासूच वाट्याला आली', विरोधकांनी विधिमंडळाच्या पायऱ्यांवर केली घोषणाबाजी

By ऑनलाइन लोकमत | Published: July 17, 2023 03:14 PM2023-07-17T15:14:19+5:302023-07-17T15:18:02+5:30

Maharashtra Monsoon Session : विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाला आजपासून सुरुवात झाली.

Maharashtra Monsoon Session Opposition parties raised slogans against the state government on the steps of the legislature | 'सासूमुळे वाटणी झाली, सासूच वाट्याला आली', विरोधकांनी विधिमंडळाच्या पायऱ्यांवर केली घोषणाबाजी

'सासूमुळे वाटणी झाली, सासूच वाट्याला आली', विरोधकांनी विधिमंडळाच्या पायऱ्यांवर केली घोषणाबाजी

googlenewsNext

मुंबई- विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाला आजपासून सुरुवात झाली, विरोधी पक्षांनी पहिल्याच दिवशी विधान भवनच्या पायऱ्यांवर सरकार विरोधात घोषणाबाजी केली. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात पडलेल्या फुटीनंतर हे पहिलेच अधिवशेन आहे. 'सासूमुळे वाटणी झाली, सासुच वाटणीला आली', अशा घोषणा विरोधकांनी दिल्या आहेत. विरोधी पक्षाच्या नेत्यांनी, घटनाबाह्य कलंकीत सरकारचा धिक्कार असो',अशा आशयाचे बॅनर लावले आहेत. 

विधानभवनाच्या पायऱ्यांवर आंदोलनाला शरद पवार गटाचे आमदार का नव्हते? ठाकरे गटाच्या आमदाराने स्पष्टच सांगितलं

राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये पडलेल्या फुटीनंतर पक्षातील आमदार कोणती भूमीका घेणार ही चर्चा राजकीय वर्तुळात सुरू होती. दरम्यान, आज पहिल्याच दिवशी विरोधी पक्षांनी विधिमंडळाच्या पायऱ्यांवर सरकारविरोधात घोषणाबाजी केली. यावेळी शिवसेना ( उद्धव बाळासाहेब ठाकरे) गट आणि काँग्रेसचे नेते उपस्थित होते, पण राष्ट्रवादी काँग्रेसच्या एकाही आमदाराचा यात समावेश नव्हता यामुळे राजकीय वर्तुळात चर्चा सुरू होत्या. (Maharashtra Monsoon Session)

आज पहिल्या दिवशी विरोधी पक्षांनी सरकारला घेरले. विधिमंडळाच्या पायऱ्यांवर सरकार विरोधात घोषणा दिल्या. महाविका आघाडी सरकारमधून राष्ट्रवादीला कंटाळून शिंदे गट बाहेर पडल्याचा आरोप शिंदे गटाने केला होता. पण, आता राष्ट्रवादीतील नऊ नेत्यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. विरोधी पक्षांनी शिंदे गटावर आज याच मुद्द्यावरुन टीका केली. यात विरोधी पक्षांनी, 'सासूमुळे वाटणी झाली, सासुच वाटणीला आली', अशा घोषणा दिल्या. 

विरोधकांच्या आंदोलनाला शरद पवार गटाचे आमदार का नव्हते?

विधिमंडळाच्या पायऱ्यांवर करण्यात आलेल्या सरकार विरोधी घोषणाबाजीवेळी राष्ट्रवादीचे आमदार  का उपस्थित नव्हते, यावर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाचे आमदार सचिन अहिर यांनी प्रतिक्रिया दिली. आमदार सचिन अहिर म्हणाले, महाविकास आघाडी म्हणून काल आमची बैठक झाली. आज विधिमंडळाच्या पायऱ्यांवर अनेक नेते आले होते. आज पहिलाच दिवस असल्याने अजून काही लोक आलेले नाहीत. पायऱ्यांपेक्षा सभागृहात काय भूमीका आहे ते महत्वाच आहे. मतदारांना काय ते उत्तर द्याव लागणार आहे. 

"आपआपल्या राजकीय भूमीका स्पष्ट कराव्या लागणार आहेत. आम्ही महाविकास आघाडीतील सर्वच विरोधी फक्ष एकसंघ आहोत. सभागृहातील विरोधी पक्षनेत्यांनी राजीनामा दिला आहे. आमची तुम्ही संख्या कमी करु शकता पण आवाज दाबू शकत नाहीत. गोंधळाची परिस्थिती सत्ताधारी करत आहेत, असंही सचिन अहिर म्हणाले. (Maharashtra Monsoon Session)

Web Title: Maharashtra Monsoon Session Opposition parties raised slogans against the state government on the steps of the legislature

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.