लोटस पार्कचे भोगवटा प्रमाणपत्र रद्द?

By admin | Published: July 20, 2014 02:31 AM2014-07-20T02:31:43+5:302014-07-20T02:31:43+5:30

अग्निरोधक यंत्रणा कार्यान्वित नाही तसेच फायर ऑडिट नसलेल्या लोटस पार्क या इमारतीला दिलेले भोगवटा प्रमाणपत्र रद्द करण्याची शिफारस अग्निशमन दलाने प्रशासनाकडे केली आह़े

Lotus Park's cancellation certificate canceled? | लोटस पार्कचे भोगवटा प्रमाणपत्र रद्द?

लोटस पार्कचे भोगवटा प्रमाणपत्र रद्द?

Next
मुंबई : अग्निरोधक यंत्रणा कार्यान्वित नाही तसेच फायर ऑडिट नसलेल्या लोटस पार्क या इमारतीला दिलेले भोगवटा प्रमाणपत्र रद्द करण्याची शिफारस अग्निशमन दलाने प्रशासनाकडे केली आह़े तसेच या इमारतीचा वीजपुरवठा खंडित करून नवीन भोगवटा प्रमाणपत्र मिळेर्पयत तेथील व्यवहार ठप्प करण्यात येणार आहेत़ अशा प्रकारची ही पहिलीच कारवाई असल्याने नियम धाब्यावर बसवणा:या खाजगी इमारतींना ही चापराक ठरणार आह़े
लोटस पार्क या इमारतीत अग्निरोधक यंत्रणा नादुरुस्त असल्याचे प्रथमदर्शनी आढळून आल़े याचे गंभीर परिणाम मदतकार्यासाठी गेलेल्या अग्निशमन दल जवानांना भोगावे लागल़े त्यामुळे या इमारतीचे भोगवटा प्रमाणपत्रच रद्द करण्याची शिफारस करण्यात आल्याचे उप प्रमुख अग्निशमन अधिकारी सुनील नेसरीकर यांनी सांगितल़े या इमारतीचा वीजपुरवठा खंडित करण्यात आला आह़े (प्रतिनिधी)
 
नवीन भोगवटा प्रमाणपत्रसाठी 
काय करावे लागेल ?
इमारतीचा भोगवटा प्रमाणपत्र रद्द झाल्यास नवीन प्रमाणपत्रसाठी मालकाला काही महत्त्वपूर्ण नियमांचे पालन करावे लागेल़ यामध्ये अग्निरोधक यंत्रणा कार्यान्वित करणो, पाण्याचा शिडकाव करणारे स्प्रिंकलर्स, पाणी खेचण्यास मदत करणारी यंत्र, इलेक्ट्रिक वायरिंग सील करणो, स्मोक डिटेक्शन बसवून त्याची नियमित देखभालीची शाश्वती देण्याचा समावेश असेल़ त्याचबरोबर काचेच्या तावदानांमध्येही धोरणानुसार बदल करावे लागतील़
 
लोटस पार्कमध्ये अग्निरोधक यंत्रणा नादुरुस्त असल्याने महाराष्ट्र आग प्रतिबंध कायदा व महापालिका अधिनियम 1888 तसेच महाराष्ट्र आग प्रतिबंधक कायद्यानुसार इमारत मालकाला सोमवारी नोटीस बजाविण्यात येणार आह़े तसेच या इमारतीने फायर ऑडिट कधी केले होते? इमारत प्रस्ताव विभागाकडे परवानगी घेताना कोणती कागदपत्रे सादर केली, याबाबत चौकशी सुरू आह़े
 
कागदपत्रंसाठी द्या प्रतिज्ञापत्र 
22 मजल्यांच्या या इमारतीमध्ये असलेल्या कार्यालयातील महत्त्वाचे कागदपत्रे काढून घेण्याची मुभा देण्यात येईल़ परंतु यासाठी त्या कंपनीच्या दोनच व्यक्तींना आत सोडण्यात येईल़ त्यातही आपला मजला अग्निरोधक यंत्रणोद्वारे सुरक्षित करण्याची हमी त्यांना प्रतिज्ञापत्रद्वारे द्यावी लागणार आह़े
 
इमारतीच्या 22 व्या मजल्यावर आग लागली असे सांगण्यात येत़े मात्र सोसाटय़ाच्या वा:यानंतरही आग वर पसरण्याऐवजी खालच्या मजल्यांवर पोहोचली़ इलेक्ट्रिक डॅक्टिंग उघडी असल्यामुळे आग खालच्या मजल्यांवर पोहोचल्याचे प्रथमदर्शनी दिसून येत़े परंतु याची सखोल चौकशी होणार आह़े 
 
यात आगीचा उगम, प्रथमदर्शीचे कथन, अग्निरोधक यंत्रणोचा उपयोग झाला का, आगीचा फैलाव कसा झाला़, फायर ऑडिट केले होते का, तसेच इवलेकरचा मृत्यू कसा झाला, याची चौकशी होणार आह़े हा अहवाल मंगळवार्पयत प्रशासनाकडे सादर होणो अपेक्षित आह़े 
 
कायद्यानुसार प्रत्येक सहा महिन्यांनी इमारतीमधील अग्निरोधक यंत्रणोची तपासणी करून ती कार्यान्वित असल्याचे परवानाधारक एजन्सीचे प्रमाणपत्र अग्निशमन दलास सादर करणो बंधनकारक आह़े खाजगी इमारतीचे ऑडिट करण्याची जबाबदार संबंधित मालकाची असत़े या नियमाचे उल्लंघन होत असल्यास कायद्यातील तरतुदीनुसार संबंधित मालकावर फौजदारी खटला दाखल केला जाऊ शकतो़ मात्र यामुळे जवळपास सर्वच इमारतमालकांवर खटला दाखल करावा लागेल, अशी परिस्थिती असल्याची धक्कादायक वास्तव आयुक्त सीताराम कुंटे यांनी मान्य केल़े खटला दाखल करणो हा अंतिम पर्याय नसल्याने येत्या काळात जनजागृती आवश्यक ठरेल, असे मत त्यांनी व्यक्त केल़े
 
इमारतीमधील इलेक्ट्रिक डक्टमधून आग 22 व्या मजल्यावरून खालच्या मजल्यांर्पयत पसरली़ त्यामुळे अग्निशमन दलाचे 33 जवान 21 व 22 व्या मजल्यावर अडकून पडल़े त्यामुळे इमारतीच्या गच्चीच्या दिशेने जवान पळू लागल़े मात्र आगीच्या धगाने अंग भाजून निघण्याची वेळ आली होती़ संरक्षणासाठी जवानांनी दोन दिशेने रांगा करीत पाण्याचा फवारा मारत वरच्या दिशेने पळण्यास सुरुवात केली़ त्याचवेळी हेलिकॉप्टरचा आवाज ऐकू आला़ तटरक्षक दलाच्या हेलिकॉप्टरने एका जवानाची सुटका केली़ मधल्या काळात इतरांनीही खाली उतरण्यास सुरुवात केली.
 
काचेच्या तावदानांवर अंकुश
काचेची तावदाने असलेल्या इमारतींमुळे आगीच्या दुर्घटनेत मदतकार्य करण्यात अडथळा येतो़ म्हणून पालिकेने 2क्12 मध्ये काचेची तावदाने असलेल्या इमारतींवर अंकुश आणणा:या धोरणाचा मसुदा तयार केला़ या मसुद्यानुसार इमारत प्रस्ताव विभागाकडे काचेची तावदाने असलेल्या इमारतीचा आराखडा मंजुरीसाठी आल्यास त्या दृष्टीने सुरक्षेच्या नियमांचे पालन करणो संबंधित विकासकाला बंधनकारक असेल़ त्यामुळे या समस्येवर काय मार्ग काढता येईल, यावर चर्चा सुरू आहे.
 
शुक्रवारी लोट्स बिझनेस पार्क या इमारतीमध्ये लागलेल्या आगीमध्ये जखमी झालेल्या 2क् जणांना कूपर रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. या सर्व रुग्णांची प्रकृती स्थिर आहे. रविवारी सकाळी सर्वाची तपासणी करण्यात येणार आहे. यानंतर त्यांना कधी डिस्चार्ज देण्यात येईल हे ठरविण्यात येणार असल्याची माहिती रुग्णालय प्रशासनाने दिली. कूपर रुग्णालयामध्ये दाखल असलेल्या रुग्ण जास्त प्रमाणात भाजलेले नाहीत. त्यांची प्रकृती स्थिर आहे. या रुग्णांपैकी काहींना दोन ते तीन दिवसात डिस्चार्ज मिळेल.
 
कूपरमध्ये बर्न वॉर्ड नाही
भाजलेल्या रुग्णांना बर्न वॉर्डमध्ये उपचारासाठी दाखल करणो गरजेचे आहे. कूपर रुग्णालय सुरू होऊन आठ महिने झाले. मात्र अजूनही बर्न वॉर्ड सुरू करण्यात आलेला नाही. 321 कोटी रुपये खर्च करून कूपर रुग्णालयाची दुरुस्ती झाली. मात्र अजूनही येथे अनेक सुविधा उपलब्ध नाहीत. या रुग्णांना बर्न वॉर्डमध्ये का दाखल करण्यात आले नाही, या प्रश्नावर प्रशासनाने उत्तर देणो टाळले. 
 

 

Web Title: Lotus Park's cancellation certificate canceled?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.