म्हाडाच्या २१७ घरांसाठी २१ एप्रिल रोजी लॉटरी

By ऑनलाइन लोकमत | Published: March 23, 2019 06:55 AM2019-03-23T06:55:40+5:302019-03-23T06:55:51+5:30

चेंबूरमधील शेल कॉलनी व पवईतील कोपरी येथील म्हाडाच्या २१७ घरांसाठीची लॉटरीची प्रस्तावित तारीख २१ एप्रिल असून, अद्याप यात बदल करण्यात आलेला नाही.

Lottery on April 21 for 217 houses of MHADA | म्हाडाच्या २१७ घरांसाठी २१ एप्रिल रोजी लॉटरी

म्हाडाच्या २१७ घरांसाठी २१ एप्रिल रोजी लॉटरी

Next

मुंबई -  चेंबूरमधील शेल कॉलनी व पवईतील कोपरी येथील म्हाडाच्या २१७ घरांसाठीची लॉटरीची प्रस्तावित तारीख २१ एप्रिल असून, अद्याप यात बदल करण्यात आलेला नाही.
अल्प आणि मध्यम उत्पन्न गटासाठी ही घरे असून, किमती ३१ लाख ५४ हजार १०० रुपयांपासून ५६ लाख ७३ हजार ८०० रुपयांपर्यंत आहेत. घरांसाठी अर्ज नोंदणी आणि अर्ज सादर करण्याची मुदत १३ एप्रिलच्या रात्री ११.५९ पर्यंत आहे. एनईएफटी/आरटीजीएसद्वारे पेमेंट १३ एप्रिलपर्यंत बँकेच्या कामकाजादिवशी करता येईल. डेबिर्ट/क्रेडिट कार्ड, इंटरनेट बँकिंग स्वीकृती १३ एप्रिल, रात्री ११.५९ पर्यंत आहे. म्हाडाच्या म्हणण्यानुसार सर्व सदनिकांना भोगवटा प्रमाणपत्र मिळाले असून, अधिक माहिती म्हाडा लॉटरी मदत केंद्र, मित्र कार्यालय, गेट नंबर ५, गृहनिर्माण भवन, कलानगर, वांद्रे पूर्व येथे मिळेल.

२१७ घरांसाठी १९ हजार ६४८ अर्ज

शुक्रवारी सायंकाळी साडेपाच वाजेपर्यंत २१७ घरांसाठी १९ हजार ६४८ अर्ज दाखल झाले होते.
शुक्रवारी रात्री आठ वाजेपर्यंत ८ हजार १३९ अर्जदारांनी अनामत रक्कम भरल्याची माहिती म्हाडाकडून देण्यात आली.

Web Title: Lottery on April 21 for 217 houses of MHADA

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.