‘हरवलेल्या’ आईला सोशल मिडियामुळे मिळाला आधार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 29, 2018 02:22 AM2018-06-29T02:22:51+5:302018-06-29T02:23:00+5:30

मी पाच मिनीटात येतो म्हणून गेलेला मुलगा १५ दिवस झाले तरी आलाच नाही

'Lost' mother gets support from social media | ‘हरवलेल्या’ आईला सोशल मिडियामुळे मिळाला आधार

‘हरवलेल्या’ आईला सोशल मिडियामुळे मिळाला आधार

Next

अजय महाडीक
मुंबई : गेले पंधरा दिवस नालासोपाऱ्यात फिरत असलेल्या एका मनोरूग्ण महिलेला मदतीचा हात देऊन वसईतील नई दिशा स्वयंसेवी सामाजिक संस्थेच्या सदस्यांनी अजूनही माणूसकी जगात शिल्लक आहे याचे दर्शन घडविले आहे. तिला तीच्या सख्ख्या मुलाने नालासोपारा स्टेशनवर सोडले होते. सोशल मिडियावर या तिचा फोटो व्हायरल झाल्यावर मुलगा तिला न्यायला आला. ती मनोरूग्ण असल्याचे सांगून तो तिला घेऊन गेला.
नालासोपारा पूर्व येथील आशिष जंगम या रिक्षाचालकाच्या रिक्षासमोर दुपारच्या वेळी एक महिला अचानक आल्यामुळे त्याने तिची विचारपूस केली, तिने आले नाव हौसाबाई सखाराम लवटेकर असे सांगून नालासोपारा येथे चार माळ्याच्या इमारतीत मी मुलगा, सून व नातवंडासह राहते. पण सून मला त्रास देते. मला घराबाहेर काढा असे सारखे मुलाला सांगते असे तिने सांगितले. मात्र, तिला पत्ता सांगता येत नव्हता. त्यानंतर विरु यांनी वसईतील सर्व पोलीस स्टेशनमध्ये मिसिंंग तक्रार दाखल आहे का, याची चौकशी केली. मात्र त्यांना नाही हेच उत्तर मिळाले. शेवटी त्यांनी तिची एका मंदिरात राहण्याची व जेवणाची व्यवस्था केली.
हौसाबार्इंनी मुलगी व जावई जामखेड येथे राहत असल्याचे सांगितले. त्यानुसार विरु यांनी जामखेडमधील पण वसई येथे राहणाºया अमेय तावडे यांच्याशी संपर्क साधला. त्यांनी जामखेडमधील पत्रकारांच्या वॉट्सअ‍ॅप ग्रुपवर हौसाबाईचा फोटो टाकला. हा फोटो पाहिल्यावर हौसाबाईचे गाव असलेल्या रत्नापूरचे सरपंच सूर्यकांत मोरे यांनी संपर्क साधून हौसाबार्इंची ओळख पटवून दिली.

आईचा फोटो नसल्याने तक्रार दिली नाही
सोशल मिडीयावर हौसाबाईचा व्हायरल झालेला फोटो पाहून तीचा मुलगा तुकाराम व नातू शनिवारी रात्री तिला घरी नेण्यासाठी मंदिरात आले. त्यावेळी तेथे कार्यकर्ते आशिष जंगम व देवीदास म्हात्रे यांनी हौसाबाईला रात्री घरी नेण्यास विरोध केला व सकाळी येण्यास सांगितले. सकाळी संस्थेच्या कार्यकर्त्यांसमोर तुकारामने माझी आई मनोरूग्ण असून ती या अगोदरही दोन ते तीन वेळा घर सोडून गेली आहे. याबाबत हौसाबाईच्या मुलीशी व जावयाशी जामखेड येथे संपर्क साधला असता त्यांनीही आई कोणालाही न सांगता घराबाहेर पडते असे सांगीतले. हौसाबाईला तू कोणाबरोबर जाणार असे विचारले असता तिनेही मला आता मुलाबरोबर रहायचे आहे असे सांगितले. याबाबत हौसाबाईच्या मुलाला तुम्ही आई हरवल्याची तक्र ार का दाखल केली नाही असे विचारल्यावर त्याने आईचा फोटो नव्हता हे न पटणारे कारण सांगितले.

मी पाच मिनीटात येतो, तू इथेच थांब आई. असे म्हणून गेलेला मुलगा आज पंधरा दिवस झाले आला नाही. रिक्षाचालक आशिषने तीला जेवण खाऊ घातले व वसईतील नई दिशा स्वयंसेवी सामाजिक संस्थेचे अध्यक्ष विरू मळेकर यांची
भेट घेलून
दिली.

लेखी प्रतिज्ञापत्रानंतर दिला आईचा ताबा : हौसाबाईची मुलासोबत रहाण्याची इच्छा लक्षात घेऊन सदस्यांनी तिला मुलाच्या स्वाधिन केले.मात्र त्याअगोदर त्याच्याकडून तो यापुढे आईचा व्यवस्थीत सांभाळ करणार असल्याचे व पुन्हा असा प्रकार घडला तर त्यास सर्वस्वी तो जबाबदार राहिलं असे लिहून घेतले.

Web Title: 'Lost' mother gets support from social media

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.