Lokmat Maharashtrian Of The Year Awards 2018- ‘लोकमत महाराष्ट्रीयन आॅफ द इयर’चा आज महासोहळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 10, 2018 06:39 AM2018-04-10T06:39:36+5:302018-04-10T12:16:56+5:30

‘लोकमत’ समूह आयोजित व यूपीएल पुरस्कृत पाचव्या ‘लोकमत महाराष्ट्रीयन आॅफ द इयर’ पुरस्कार वितरणाचा सोहळा वरळीच्या एनएससीआयमध्ये मंगळवारी सायंकाळी विविध क्षेत्रांतील दिग्गजांच्या उपस्थितीत होत आहे.

Lokmat Maharashtrian Awards 2018- 'Lokmat Maharashtrian Of The Year' today's ambit | Lokmat Maharashtrian Of The Year Awards 2018- ‘लोकमत महाराष्ट्रीयन आॅफ द इयर’चा आज महासोहळा

Lokmat Maharashtrian Of The Year Awards 2018- ‘लोकमत महाराष्ट्रीयन आॅफ द इयर’चा आज महासोहळा

googlenewsNext

मुंबई : ‘लोकमत’ समूह आयोजित व यूपीएल पुरस्कृत पाचव्या ‘लोकमत महाराष्ट्रीयन आॅफ द इयर’ पुरस्कार वितरणाचा सोहळा वरळीच्या एनएससीआयमध्ये मंगळवारी सायंकाळी विविध क्षेत्रांतील दिग्गजांच्या उपस्थितीत होत आहे. विविध १४ क्षेत्रांतील गुणिजनांना हे पुरस्कार प्रदान केले जातील.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मुख्य पाहुणे तर ‘यूपीएल’चे ग्लोबल सीईओ जय श्रॉफ हे विशेष अतिथी असतील. रेल्वेमंत्री पीयूष गोयल, अभिनेते अक्षयकुमार, अभिनेत्री करीना कपूर, क्रिकेट संघाचे मुख्य कोच रवी शास्री यांना विशेष पुरस्कारांनी सन्मानित केले जाणार आहे. शिक्षणमहर्षी व बिहारचे माजी राज्यपाल डी. वाय. पाटील यांचा ‘जीवनगौरव’ पुरस्काराने सन्मान केला जाईल. वाचकांचा आॅनलाइन कौल व १५ नामांकित ज्युरींच्या मंथनातून विजेते निवडले असून, ते कोण याविषयी सर्वांना उत्सुकता आहे.
>फडणवीस-संजय राऊत यांच्यात रंगणार सामना
राज्यसभेचे खासदार, शिवसेनेचे नेते आणि ज्येष्ठ संपादक संजय राऊत हे या सोहळ्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ‘रोखठोक’ मुलाखत घेणार आहेत. या मुलाखतीची तमाम मराठीजनांमध्ये असलेली उत्सुकता आता शिगेला पोहोचली आहे. भाजपा-शिवसेनेतील ताणलेले संबंध, शिवसेनेकडून भाजपावर होत असलेले शाब्दिक हल्ले या पार्श्वभूमीवर, संजय राऊत शब्दांची कुठली गुगली टाकतात आणि मुख्यमंत्री त्यावर किती चौकार षटकार लगावतात, याची उत्कंठा आहे.
या समारंभाचे वैशिष्ट्य म्हणजे, एके काळी क्रिकेटचे मैदान गाजविणारे रवी शास्त्री यांची मुलाखत प्रख्यात क्रीडा समीक्षक व ज्येष्ठ पत्रकार अय्याज मेमन घेतील. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी आणि विविध सामाजिक उपक्रमांमध्ये सक्रिय सहभाग देणाऱ्या प्रतिभाशाली महिला अमृता फडणवीस यांची मुलाखत मराठी अभिनेत्री किशोरी शहाणे घेतील.

Web Title: Lokmat Maharashtrian Awards 2018- 'Lokmat Maharashtrian Of The Year' today's ambit

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.