लोकमत कालदर्शिका’ घरोघरी!

By admin | Published: December 24, 2016 03:35 AM2016-12-24T03:35:54+5:302016-12-24T03:35:54+5:30

‘लोकमत कालदर्शिके’त वैविध्यपूर्ण विषयांवर समाजातील विविध क्षेत्रांतील मान्यवरांनी विचार मांडले आहेत. गेल्या काही वर्षांत

Lokmat Calender 'Ghargharri! | लोकमत कालदर्शिका’ घरोघरी!

लोकमत कालदर्शिका’ घरोघरी!

Next

‘मुंबई : ‘लोकमत कालदर्शिके’त वैविध्यपूर्ण विषयांवर समाजातील विविध क्षेत्रांतील मान्यवरांनी विचार मांडले आहेत. गेल्या काही वर्षांत आकर्षक मांडणी, वैशिष्ट्यपूर्ण माहितीचा खजिना यामुळे कालदर्शिकेने वाचकांच्या घरोघरी जागा मिळविली आहे. याशिवाय, तिथी, पंचांग, मुहूर्त, राशिभविष्य, संकष्टी चतुर्थी यांविषयी महत्त्वपूर्ण माहिती कालदर्शिकेत आहे.
यंदाच्या कालदर्शिकेत श्रीश्री रविशंकर, अभिनेत्री मृणाल कुलकर्णी, पांडुरंगशास्त्री आठवले, प्रकाश आमटे, नाना पाटेकर-मकरंद अनासपुरे, अण्णासाहेब मोरे, सदाशिव निंबाळकर, वामनराव पै, डॉ. आप्पासाहेब धर्माधिकारी, महेश इंगळे, डॉ. रविराज अहिरराव, शेफ संजीव कपूर या दिग्गजांनी आपले विचार मांडले आहेत.
शिवाय, आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे खास साईनामाचा जागर म्हणून ‘शिर्डी’ संस्थानाच्या कार्याचा प्रवास आणि माहितीचाही कालदर्शिकेत समावेश आहे.
याशिवाय, वार्षिक पंचांगात ग्रहणांची माहिती, सौंदर्यसाधना, घरचा वैद्य, पर्जन्य अंदाज अशी दैनंदिन दिनक्रमातील महत्त्वाची माहिती अंतर्भूत आहे. तसेच, विविध क्षेत्रांतील मान्यवरांनी आपली मते मांडली आहेत. (प्रतिनिधी)

Web Title: Lokmat Calender 'Ghargharri!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.