लोकलसह एक्स्प्रेस खोळंबली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 19, 2018 05:56 AM2018-05-19T05:56:57+5:302018-05-19T05:56:57+5:30

मशीद स्थानकाजवळील रेल्वे रुळांच्या जोडणीमध्ये झालेल्या तांत्रिक बिघाडामुळे शुक्रवारी एक्स्प्रेससह लोकल फेऱ्यांचे वेळापत्रकही कोलमडले.

Local Express Express | लोकलसह एक्स्प्रेस खोळंबली

लोकलसह एक्स्प्रेस खोळंबली

googlenewsNext

मुंबई : मशीद स्थानकाजवळील रेल्वे रुळांच्या जोडणीमध्ये झालेल्या तांत्रिक बिघाडामुळे शुक्रवारी एक्स्प्रेससह लोकल फेऱ्यांचे वेळापत्रकही कोलमडले. डाउन जलद मार्गावर सकाळी साडेअकरा वाजताच्या सुमारास झालेल्या बिघाडाचा परिणाम दुपारच्या सत्रातील लोकल फेºयांवरही झाला. यामुळे दुपारी १२ वाजल्यानंतर बहुतांश लोकल फेºया १५ ते २० मिनिटे उशिराने धावत होत्या.
मध्य रेल्वे मार्गावरील मशीद स्थानकालगत असलेल्या रुळांच्या जोडणीवरून शुक्रवारी सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास डाउन टिटवाळा लोकल रवाना झाली. यानंतर, काही मिनिटांतच रेल्वे रुळांच्या जोडणीत तांत्रिक बिघाड झाला. सकाळी ११ वाजून ३८ मिनिटे ते दुपारी १२ वाजेपर्यंत बिघाड दुरुस्तीचे काम सुरू होते. यामुळे डाउन जलद मार्गावरील लोकलचे वेळापत्रक विस्कळीत झाले, शिवाय हुसैन सागर एक्स्प्रेसही खोळंबली. रेल्वे प्रशासनाने बिघाडाचे गांभीर्य लक्षात घेत, जलद मार्गावरील लोकल फेºया धिम्या मार्गावर वळविल्या.
तांत्रिक बिघाडामुळे सीएसएमटी ते भायखळा या स्थानकांदरम्यानची वाहतूक धिम्या मार्गावर वळविण्यात येणार असल्याची उद्घोषणा मध्य रेल्वेच्या सर्व स्थानकांवर करण्यात येत होती. बिघाड दुरुस्तीनंतरही दुपारच्या सत्रातील लोकल फेºया सुमारे १५ ते २० मिनिटे उशिराने धावत होत्या.

Web Title: Local Express Express

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.