बालकांवरील अत्याचार रोखण्यासाठी मुख्यमंत्र्यांना पत्र

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 9, 2017 04:52 AM2017-08-09T04:52:53+5:302017-08-09T04:52:53+5:30

मुंबईसह राज्यभरात अल्पवयीन मुलांवरील अत्याचाराच्या घटनांमध्ये वाढ झाल्याचे वास्तव ‘लोकमत’ने ६ आॅगस्टच्या अंकात मांडले होते.

Letter to the Chief Minister to prevent the atrocities against the children | बालकांवरील अत्याचार रोखण्यासाठी मुख्यमंत्र्यांना पत्र

बालकांवरील अत्याचार रोखण्यासाठी मुख्यमंत्र्यांना पत्र

Next

 मुंबई : मुंबईसह राज्यभरात अल्पवयीन मुलांवरील अत्याचाराच्या घटनांमध्ये वाढ झाल्याचे वास्तव ‘लोकमत’ने ६ आॅगस्टच्या अंकात मांडले होते. त्याची दखल घेत शिवसेनेच्या उपनेत्या आणि विधान परिषद सदस्य नीलम गोऱ्हे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना सविस्तर पत्र लिहिले आहे.
या भीषण वास्तवाकडे मुख्यमंत्र्यांचे लक्ष वेधत, गोऱ्हे  यांनी यावर तातडीने प्रतिबंधात्मक उपाययोजना उपाययोजनांची मागणी केली आहे.
यासंदर्भात शाळा- महाविद्यालयांमध्ये विद्यार्थी- पालकांमध्ये जागृती करणारे कार्यक्रम राबविण्यात यावेत, निवासी संस्थांमध्ये मुलांना योग्य संरक्षण मिळावे, राज्य बालहक्क आयोगाच्या कार्यकक्षा अधिक मजबूत कराव्यात, बालकांना न्यायालयात साक्ष देण्यासाठी व्हिडिओ कॉन्फरान्सीगचा वापर करण्यात यावा, बाल गुन्हेगारांचे पुनर्वसन करण्याच्या उद्देशाने उपाययोजना करण्यात याव्यात, पीडित बालकांचे
समुपदेशन करण्यात यावे, आदी मागण्या गोºहे यांनी पत्रातून केल्या आहेत.

Web Title: Letter to the Chief Minister to prevent the atrocities against the children

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.