आरोग्यमंत्र्यांकडून लेप्टो रुग्णांची चौकशी

By admin | Published: July 10, 2015 09:26 PM2015-07-10T21:26:31+5:302015-07-10T21:26:31+5:30

(हॅलो...शिल्लक)

Lepotoco patients inquiry by health workers | आरोग्यमंत्र्यांकडून लेप्टो रुग्णांची चौकशी

आरोग्यमंत्र्यांकडून लेप्टो रुग्णांची चौकशी

Next
(ह
ॅलो...शिल्लक)
......................
आरोग्यमंत्र्यांकडून लेप्टो रुग्णांची चौकशी
कांदिवली शताब्दी रुग्णालयाला भेट
मुंबई: मुंबईसह उपनगरामध्ये लेप्टोच्या साथीने बळी जाणार्‍यांच्या संख्येत वाढ होत आहे. गुरुवारी दुपारी आरोग्यमंत्री डॉ. दीपक सावंत यांनी कांदिवली पि›मच्या शताब्दी रुग्णालयाला भेट दिली. याठिकाणी त्यांनी रुग्णांची चौकशी केली.
सावंत यांनी शताब्दीच्या अतिदक्षता विभागात लेप्टोस्पायरोसीसने ग्रस्त असलेल्या रुग्णांची चौकशी केली. तसेच त्यांच्या नातेवाईकांसोबतही चर्चा केली. लेप्टोची लक्षणे आढळलेल्या लोकांची संख्या अद्याप ८६ असून त्यात ३६ जणांना लागण झाल्याचे एका वैद्यकीय अधिकार्‍याने सांगितले. तर या आजाराने दगावलेल्यांची संख्या १४ इतकी झाल्याचेही त्यांनी नमूद केले. दहिसर ते गोरेगाव या प˜्यामध्ये कचरा आणि घाणीचे साम्राज्य अधिक असल्याने या विभागात या आजाराची लागण होण्याचे प्रमाण अधिक असल्याचे स्थानिक नगरसेवकांचे म्हणणे आहे. त्यानुसार गुरुवारी आरोग्यमंत्र्यांसोबत मुंबई काँग्रेस अध्यक्ष संजय निरुपम, विरोधी पक्षनेते देवेंद्र आंबेरकर तसेच स्थानिक नगरसेवक शिवा शे˜ी, योगेश भोईर, गीता यादव, अजंता यादव, राम आशिष गुप्ता, नेहा पाटील यांच्यासह पालिकेचे वैद्यकीय अधिकारी उपस्थित होते. कांदिवलीनंतर त्यांनी मालाडच्या मालवणी परिसरालाही भेट दिली. (प्रतिनिधी)

Web Title: Lepotoco patients inquiry by health workers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.