Lalbaugcha Raja Visarjan : बुडालेल्या एका लहानग्याचा शोध सुरू, तिघांवर नायर रुग्णालयात उपचार
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 24, 2018 15:17 IST2018-09-24T14:27:10+5:302018-09-24T15:17:38+5:30
Lalbaugcha Raja Visarjan सुदैवाने सर्वांना कोळी बांधवांनी पाण्यातून बाहेर काढले. महत्वाचे म्हणजे बोटीतील १ लहान मुलाला सागर पागधरे या कोळी बांधवाने वाचवले. तर दुसऱ्या लहानग्या मुलाचा शोध सुरु आहे.

Lalbaugcha Raja Visarjan : बुडालेल्या एका लहानग्याचा शोध सुरू, तिघांवर नायर रुग्णालयात उपचार
मुंबई - तब्बल २२ तासांनंतर लालबागच्या राजाची विसर्जन मिरवणूक गिरगाव चौपाटीवर दाखल झाली. त्यावेळी गिरगाव चौपाटीवर राजाला विसर्जनासाठी तराफ्यावरून खोल पाण्यात घेऊन जात असताना असंख्य भाविकांची तोबा गर्दी होते. काही कार्यकर्ते आणि भाविक कोळी बांधवांच्या बोटीतून राजाच्या तराफ्यासोबत खोल समुद्रात जात होते. यावेळी सकाळी ८. ४५ वाजताच्या दरम्यान तराफ्यासोबत असलेल्या बोटींपैकी एक राजधानी नावाची बोट दोन बोटींची धडक लागून आणि समुद्राला भरती असल्याने कलंडून समुद्रात उलटी झाली आणि बोटीतील सर्व भाविक समुद्रात बुडाले. सुदैवाने सर्वांना कोळी बांधवांनी पाण्यातून बाहेर काढले. महत्वाचे म्हणजे बोटीतील १ लहान मुलाला सागर पागधरे या कोळी बांधवाने वाचवले होते. मात्र या लहानग्या मुलाचा शोध अद्याप सुरू आहे.
बुडालेल्यांच्या मदतीला धावून गेलेल्या सागर पागधरेशी 'लोकमत'ने संवाद साधला असता सागरने सांगितले की, आज सकाळी ८. ४५ वाजताच्या सुमारास हि घटना घडली असून मी लालबागमधील एका मुलाला पाण्यातून बाहेर काढले. त्यानंतर एक लहान मुलगा बोटीखाली जाळ्यात अडकला होता. त्याला बाहेर काढून मी आजूबाजूला बऱ्याच बोटी होत्या. त्या बोटीत एकाकडे दिला. बोटीत अंदाजे १० ते १५ माणसं होती असून पूर्ण बोटच पलटी झाल्याने सर्वच पाण्यात बुडाले. मात्र आजूबाजूला असलेल्या बोटीतील बांधवांनी तात्काळ त्यांना मदत करून पाण्याबाहेर काढले. १ महिला आणि २ पुरुष यांना उपचारासाठी नायर रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
या लहानग्या मुलाचा शोध सुरूच