जुहू समुद्रकिनारी आॅइल टार बॉल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 21, 2018 06:02 AM2018-07-21T06:02:25+5:302018-07-21T06:02:34+5:30

जुहू बीचवर समुद्राच्या भरतीमध्ये आॅइल टार बॉल (तेलाच्या गुठळ्या) मोठ्या प्रमाणात शुक्रवारी सकाळी वाहून आले.

Juhu seaside oil tar ball | जुहू समुद्रकिनारी आॅइल टार बॉल

जुहू समुद्रकिनारी आॅइल टार बॉल

Next

- मनोहर कुंभेजकर 
मुंबई : जुहू बीचवर समुद्राच्या भरतीमध्ये आॅइल टार बॉल (तेलाच्या गुठळ्या) मोठ्या प्रमाणात शुक्रवारी सकाळी वाहून आले. समुद्राच्या भरतीत मोठ्या प्रमाणात वाहून आलेल्या प्लॅस्टिकमुळे सुमारे ४.५ किमीचा जुहू बीच बकाल झाला.
गेल्या १० वर्षांपासून सी गार्डीयन असोसिएशनचे अध्यक्ष सुनील कनोजिया सकाळी जुहू चौपाटीवर येतात आणि या बीचची आज स्थिती काय आहे याची माहिती ते थेट पंतप्रधान, राष्ट्रपती व अनेकांंना सोशल मीडियावरून देत असतात. गेले तीन-चार दिवस येथे सकाळी समुद्रातून वाहून येणाऱ्या प्लॅस्टिकबरोबर आॅइल टार बॉल (तेलाच्या गुठळ्या) येथील समुद्रकिनारी वाहून आल्या. त्यामुळे जुहू बीच काळवंडलेला दिसत आहे.
कनोजिया यांनी सांगितले, खोल समुद्रात मोठी मालवाहू व तेलवाहू जहाजे असतात. त्यामधील आॅइल समुद्रात मिसळते आणि मग भरतीत हे आॅइल टार बॉल विशेष करून पावसाळ्यात समुद्रकिनारी वाहून येतात. तर काहींच्या म्हणण्याप्रमाणे ही नैसर्गिक प्रक्रिया आहे. या आॅइल टार बॉलचा उग्र दर्प येतो. ते कपड्याला लागल्यास लवकर निघत नाही. कोळी महासंघाचे सरचिटणीस, मत्स्य अभ्यासक राजहंस टपके यांनी सांगितले, खोल समुद्रातील देशी-विदेशी मालवाहू किंवा तेलवाहू जहाजांमधून झालेल्या तेलगळतीमुळे या तेलाच्या गुठळ्या जुहू समुद्रकिनारी आल्या असतील. मच्छीमारांचे म्हणणे आहे की, मुंबई हायमध्ये असलेल्या तेल विहिरींमधून तेल काढत असताना होणाºया गळतीमुळे या तेलाच्या गुठळ्या येथे आल्या असतील. साधारणत: पावसात समुद्र खवळलेला असतो आणि पाऊस हा दक्षिणेकडून उत्तरेकडे येत असल्यामुळे समुद्राला करंट असतो. पावसात भरतीत या तेलाच्या गुठळ्या मुंबईतील समुद्रकिनारी आढळतात. इतर देशांत जर आपली जहाजे गेली तर तिकडे आंतरराष्ट्रीय नॉर्मसप्रमाणे जहाजातील टाकाऊ पाणीच काय, साधा कचरा व समुद्रात तेलही सोडता येत नाही. मात्र आपल्याकडील शासकीय यंत्रणा कमकुवत असल्यामुळे अशा घटना नेहमीच घडतात.
भाजपा आमदार रमेश पाटील यांनी सांगितले, यासंदर्भात आपण माहिती घेऊन यावर प्रभावी उपाययोजना करण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व मत्स्यव्यवसाय मंत्री महादेव जानकर यांच्याबरोबर बैठक आयोजित करू.

Web Title: Juhu seaside oil tar ball

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Mumbaiमुंबई