एसटीच्या कार्यक्रमात पत्रकार, कार्यकर्ते ‘भिडले’; मुंबई सेंट्रल एसटी स्थानकातील प्रकार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 16, 2018 02:30 AM2018-02-16T02:30:54+5:302018-02-16T02:31:10+5:30

मुंबई सेंट्रल एसटी स्थानकात सॅनिटरी नॅपकिन वेडिंग मशिनचे उद्घाटन गुरुवारी अभिनेता अक्षय कुमार यांच्या हस्ते करण्यात आले. या वेळी परिवहनमंत्री आणि एसटी अध्यक्ष दिवाकर रावते आणि युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे हे उपस्थित होते.

Journalists, activists 'bhadle' in ST program; Types of Mumbai Central Station Station | एसटीच्या कार्यक्रमात पत्रकार, कार्यकर्ते ‘भिडले’; मुंबई सेंट्रल एसटी स्थानकातील प्रकार

एसटीच्या कार्यक्रमात पत्रकार, कार्यकर्ते ‘भिडले’; मुंबई सेंट्रल एसटी स्थानकातील प्रकार

Next

मुंबई : मुंबई सेंट्रल एसटी स्थानकात सॅनिटरी नॅपकिन वेडिंग मशिनचे उद्घाटन गुरुवारी अभिनेता अक्षय कुमार यांच्या हस्ते करण्यात आले. या वेळी परिवहनमंत्री आणि एसटी अध्यक्ष दिवाकर रावते आणि युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे हे उपस्थित होते. मात्र, स्थानकातील निमुळत्या जागी हा कार्यक्रम ठेवण्यात आल्यामुळे कार्यक्रमाचे वार्तांकन करण्यासाठी आलेल्या पत्रकारांना कार्यकर्त्यांकडून धक्काबुक्की करण्यात आली. परिणामी, अक्षय कुमारसह मंत्री रावते आणि शिवसेना नेते आदित्य ठाकरे हे उपस्थितांशी एकही शब्द न बोलता कार्यक्रमातून निघून गेले.
एसटी महामंडळाने एसटीने प्रवास करणाºया महिला प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी सॅनिटरी नॅपकिन वेडिंग मशिन कार्यान्वित करण्याचा निर्णय घेतला. मुंबई सेंट्रल येथील शौचालयाच्या मुख्यभागी हे वेडिंग मशिन कार्यरत करण्यात आले. मात्र, कार्यक्रमात महामंडळाच्या ढिसाळ नियोजनाचा प्रत्यय आला. गुरुवारी ४.३० वाजता होणारा कार्यक्रम ५.४५च्या सुमारास सुरू झाला. कार्यक्रम निमुळत्या जागेत असल्याने कार्यकर्ते, चाहते, एसटी कर्मचारी-अधिकारी आणि प्रवासी यांची गर्दी झाली. या वेळी कार्यकर्ते फुलांचे गुच्छ घेऊन पाहुण्यांचे स्वागत करण्यासाठी पुढे सरसावले. अभिनेता अक्षय कुमारची प्रतिक्रिया घेण्यासाठी महिला पत्रकारांसह छायाचित्रकारही उपस्थित होते. या वेळी कार्यकर्त्यांनी धक्काबुक्की करत पुढे जाण्याचा प्रयत्न केला. यात इलेक्ट्रॉनिक माध्यम प्रतिनिधींच्या कॅमेरा साहित्याचेही नुकसान झाले.

दहा ठिकाणी सोय
सध्या केवळ मुंबई सेंट्रल एसटी स्थानकावर वेडिंग मशिन कार्यरत आहे. अवघ्या २० रुपयांत ३ सॅनिटरी नॅपकिनचे पाकीट या स्वयंचलित यंत्रातून मिळेल. पाच रुपयांच्या चार कॉइन किंवा दहा रुपयांचे दोन कॉइन या यंत्रात टाकल्यानंतर सॅनिटरी नॅपकिन उपलब्ध होतील. राज्यातील अजून १० बसस्थानकांवर लवकरच अशी सॅनिटरी नॅपकिनची स्वयंचलित यंत्रे बसविण्यात येणार असल्याची माहिती एसटी महामंडळाने दिली.

Web Title: Journalists, activists 'bhadle' in ST program; Types of Mumbai Central Station Station

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.