नोकरभरतीची चौकशी

By Admin | Published: December 18, 2014 12:53 AM2014-12-18T00:53:25+5:302014-12-18T00:53:25+5:30

राज्यातील सर्व बाजार समित्यांमध्ये नियमबाह्यपणे करण्यात आलेल्या नोकरभरतीची चौकशी करण्यात यावी. वशिल्याने केलेली भरती रद्द करण्यात यावी अशा सूचना पणन संचालकांनी दिल्या आहेत.

Job recruitment | नोकरभरतीची चौकशी

नोकरभरतीची चौकशी

googlenewsNext

नवी मुंबई : राज्यातील सर्व बाजार समित्यांमध्ये नियमबाह्यपणे करण्यात आलेल्या नोकरभरतीची चौकशी करण्यात यावी. वशिल्याने केलेली भरती रद्द करण्यात यावी अशा सूचना पणन संचालकांनी दिल्या आहेत.
कृषी मालास चांगला भाव मिळावा यासाठी महाराष्ट्रात कृषी उत्पन्न बाजार समित्या स्थापन करण्यात आल्या आहेत. सद्यस्थितीमध्ये जवळपास ३०५ बाजार समित्या राज्यात सुरू आहेत. यामधील अनेक समित्या या शेतकऱ्यांच्या हितापेक्षा राजकीय कार्यकर्त्यांचे राजकीय पुनर्वसन करण्याचे केंद्र म्हणून ओळखल्या जावू लागल्या आहेत. पणन संचालक म्हणून सुभाष माने यांनी पदभार स्वीकारल्यापासून बाजार समित्यांमधील अनागोंदी कारभारास चाप लावण्यास सुरवात केली आहे. सर्व बाजार समित्यांमध्ये झालेल्या नोकरभरत्यांची चौकशी करण्यात यावी. ज्या ठिकाणी वशिलेबाजीने नेत्यांचे नातेवाईक व इतरांची भरती झाली असेल तर ती तत्काळ रद्द करण्यात यावी अशा सूचना करण्यात आल्या आहेत. याविषयी परिपत्र सर्व बाजार समित्यांना सोमवारी पाठविण्यात आले आहे. सुभाष माने यांनी सांगितले की, नातेवाईकांची वशिल्याने केलेली भरती रद्द होणे आवश्यक आहे. णवान व पात्र तरुणांना नोकरीमध्ये संधी मिळाली पाहिजे . (प्रतिनिधी)

Web Title: Job recruitment

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.