Jail Bharo for Maratha Reservation Live : औरंगाबादमध्ये मुंडन आंदोलन करत सरकारचा नोंदवला निषेध
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 1, 2018 15:15 IST2018-08-01T07:39:43+5:302018-08-01T15:15:45+5:30
Jail Bharo for Maratha Reservation Live : सकल मराठा समाजाने आज जेलभरो आंदोलनाची हाक दिली आहे.

Jail Bharo for Maratha Reservation Live : औरंगाबादमध्ये मुंडन आंदोलन करत सरकारचा नोंदवला निषेध
मुंबई : सकल मराठा समाजाने आज जेलभरो आंदोलनाची हाक दिली आहे. 9 आॅगस्टपर्यंत सरकारने निर्णय जाहीर केला नाही, तर मंत्रालयाला घेराव घालण्याचा इशारा मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक विनोद पोखरकर यांनी दिला आहे. काकासाहेब शिंदे यांनी दिलेल्या बलिदानानंतर क्रांती मोर्चाचा वणवा पेटलेला आहे. आता ‘मूक मोर्चा’ निघणार नाही. आज प्रत्येक जिल्ह्यात जिल्हानिहाय जेलभरो आंदोलन सुरू करण्यात आले आहे. मुंबईतही जेलभरो आंदोलनाला सुरुवात करण्यात आली आहे. याच काळात परळी येथे सुरू असलेल्या ठिय्या आंदोलनाच्या ठिकाणी राज्यव्यापी खुली बैठक होईल. त्यात 9 आॅगस्टच्या आंदोलनाबाबत घोषणा केली जाईल, असे पोखरकर यांनी सांगितले.
दरम्यान, सरकारला इशारा देण्यासाठी जेलभरो आंदोलन करण्यात येत आहे. हे आंदोलन शांततेच्या मार्गाने केले जाईल. त्यामुळे पुन्हा उद्रेक होण्याआधी सरकारने योग्य तो निर्णय जाहीर करण्याची गरज पोखरकर यांनी व्यक्त केली. समन्वयक अमोल जाधवराव यांनी सांगितले की, मुंबईसह ठाणे, नवी मुंबई, रायगड जिल्ह्यामध्ये पुकारलेल्या बंददरम्यान ज्या कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत, ते तत्काळ मागे घेण्याची मागणी संघटनेने मुख्यमंत्र्यांकडे केली आहे. याशिवाय कोणत्याही मागणीवर आता चर्चा होणार नाही.
LIVE UPDATES :
नांदेड : आंदोलकांनी अर्धापूर तालुक्यात मेंढला गावाजवळ महामार्गावर टायर जाळले, एक ऑटोरिक्षादेखील पेटवली.
औरंगाबाद : जालना रोडवरील वरूडपाटी येथे मराठा आरक्षणासाठी रास्तारोको. काही आंदोलकांनी मुंडण करून केला सरकारचा निषेध.
औरंगाबाद : जळगाव महामार्गावर बिलडा फाट्यावर मराठा क्रांती मोर्चाच्यावतीने रास्तारोको.
(Maratha Reservation : मराठा समाजासाठी स्वतंत्र राजकीय पक्षाची गरज - हर्षवर्धन जाधव)
मुंबई - मुख्यमंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी करत मराठा क्रांति मोर्चाची निदर्शने
मराठा क्रांति मोर्चाकडून मुंबईतील आझाद मैदानात जेलभरो आंदोलनाला सुरूवात
लातूर : पालकमंत्री संभाजी पाटील-निलंगेकर यांच्या निवासस्थानासमोर आंदोलकांचा ठिय्या, निवासस्थानाबाहेर पोलीस बंदोबस्त तैनात.
नाशिक : मालेगावात जेलभरो आंदोलनाला सुरुवात
औरंगाबाद : जालना रोडवरील वरूडपाटी येथे मराठा आरक्षणासाठी रास्तारोको, काही आंदोलकांनी मुंडन करून केला सरकारचा निषेध.
#MarathaReservationProtest: Protesters block Pune-Solapur highway. pic.twitter.com/JjZgTKAlIX
सोलापूर : कोंडी गावाजवळ आंदोलकांचा ठिय्या, सोलापूर- पुणे महामार्ग ठप्प. महामार्ग रोखल्यानं वाहतूक ठप्प, वाहनांच्या लांबच लांब रांगा