अथर्व शिंदे मृत्यू प्रकरणाचा तपास क्राइम ब्रँचकडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 20, 2018 01:51 AM2018-05-20T01:51:23+5:302018-05-20T01:51:23+5:30

पित्याच्या मागणीनंतर आयुक्तांचा निर्णय : सीसीटीव्ही फुटेज महत्त्वाचा पुरावा

Investigation of the death case of Atharv Shinde on the crime branch | अथर्व शिंदे मृत्यू प्रकरणाचा तपास क्राइम ब्रँचकडे

अथर्व शिंदे मृत्यू प्रकरणाचा तपास क्राइम ब्रँचकडे

Next

मुंबई : आरे परिसरात मृतावस्थेत आढळून आलेल्या अथर्व शिंदेच्या मृत्यूचे गूढ उलगडण्यात अद्याप आरे पोलिसांना यश न आल्याने, या प्रकरणाचा तपास आता गुन्हा अन्वेषण शाखेकडे वर्ग करण्यात आला आहे. या प्रकरणात उचभू्र मंडळींच्या मुलाचा सहभाग आहे. त्यामुळे तपासातील पुरावे नष्ट करण्यात येत असल्याचा आरोप अथर्वचे वडील व निरीक्षक अंकुश शिंदे यांनी आयुक्त दत्ता पडसलगीकर यांना दिलेल्या निवेदनात केलाआहे. त्यामुळे हा निर्णय घेण्यात आल्याचे अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले.
आरे पोलिसांनी शुक्रवारी रात्री उशिरा संबंधित कागदपत्रे क्राइम ब्रँचकडे सुपुर्द केली. कक्ष-११च्या पथकाकडून त्याचा छडा लावण्याचा प्रयत्न केला जाईल. परिसरातील सीसीटीव्ही कॅमेºयातून उपलब्ध झालेले फुटेज हे तपासात महत्त्वाची बाब असणार असल्याचे अधिकाºयांकडून सांगण्यात आले.
६ मेपासून बेपत्ता झालेल्या अथर्वचा मृतदेह ९ मे रोजी आढळून आला होता. मात्र, त्याच्या मृत्युमागील नेमक्या कारणाचा शोध पोलिसांना अद्याप घेता आलेला नाही. पुरावे मिटविल्याचा संशय अथर्वचे वडील आणि क्राइम ब्रँचमधील निरीक्षक नरेंद्र शिंदे यांनी व्यक्त केला आहे.
तरी संबंधित बंगला आणि त्याच्या बाहेर असलेल्या जंगल परिसरात ठिकठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे बसविलेले आहेत. तपासणीसाठी त्याचे फुटेज पोलिसांकडून ताब्यात घेण्यात आले आहेत. त्यामुळे ते फुटेज मिटविणे आता शक्य नाही. त्याचसोबत, ज्यांच्यावर अर्थवच्या वडिलांनी संशय व्यक्त केला होता, त्या सर्वच मुलांना पुन्हा एकदा चौकशीसाठी बोलविण्यात येणार असून, गरज पडल्यास त्यांचेही जबाब पुन्हा नोंदविण्यात येणार आहेत, असेही त्यांच्याकडून सांगण्यात आले.

लैंगिक अत्याचार झाल्याचा आरोप
अथर्वची रॅगिंग करून त्याच्यावर लैगिंक अत्याचार करण्यात आले. अथर्वच्या मागे धावणारी त्याची मैत्रीण आणि सोबतच्या मुलांची चौकशी सविस्तरपणे करण्यात यावी, अशी विनंती अथर्वच्या वडिलांनी पोलीस महासंचालक आणि आयुक्तांना लिहिलेल्या सहा पानी पत्रात केली आहे. अथर्वच्या मृत्यूनंतर अद्यापही त्याचा मृत्यूमागचे नेमके कारण शोधून काढण्यात पोलिसांना यश आलेले नाही. उच्चभ्रू मुलांना वाचविण्याचा प्रयत्न आरे पोलीस करत असल्याचा आरोप अथर्वच्या वडिलांनी केला आहे.

Web Title: Investigation of the death case of Atharv Shinde on the crime branch

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.