निर्माणाधीन युद्धनौकेवर लागलेल्या भीषण आगीत एकाचा मृत्यू 

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 21, 2019 21:48 IST2019-06-21T21:46:08+5:302019-06-21T21:48:31+5:30

डॉक्टरांनी बजेन्द्र यांना मृत घोषित केले.  

INS Vishakhapatnam warship break out big fire, one worker dead | निर्माणाधीन युद्धनौकेवर लागलेल्या भीषण आगीत एकाचा मृत्यू 

निर्माणाधीन युद्धनौकेवर लागलेल्या भीषण आगीत एकाचा मृत्यू 

ठळक मुद्दे युद्धनौकेत अडकलेले असताना बाहेर काढून उपचारासाठी जे. जे. रुग्णालयात दाखल करण्यात आले. बजेन्द्र कुमार हा कंत्राटी कामगार असल्याची माहिती मिळत आहे. 

मुंबई - माझगाव डॉकमध्ये निर्माणाधीन आयएनएस विशाखापट्टणमवर भीषण आग लागली असून घटनास्थळी अग्निशमन दलाचे पथक दाखल झाले आहे. ही आग आज सायंकाळी ५. ४४ वाजताच्या सुमारास लागली असून अग्निशमन दलाचे जवान आग विझविण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरु आहेत. मात्र, या भीषण आगीत अडकलेल्या एकाचा मृत्यू झाला आहे. २३ वर्षीय बजेन्द्र कुमार असं मृत व्यक्तीचे नाव आहे. ते आग लागलेल्या युद्धनौकेत अडकलेले असताना बाहेर काढून उपचारासाठी जे. जे. रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, दरम्यान डॉक्टरांनी बजेन्द्र यांना मृत घोषित केले. १०० टक्के भाजल्याने बजेन्द्र यांचा या आगीत मृत्यू झाला अशी माहिती सूत्रांनी दिली. 

अग्निशमन दलाच्या १५ गाड्या घटनास्थळी दाखल असून अग्निशमन दलाचे मुख्य अधिकारी पथकासहा आग विझविण्याचे कार्य करत आहेत. अग्निशमन दलाच्या १५ गाड्या घटनास्थळी दाखल असून अग्निशमन दलाचे मुख्य अधिकारी पथकासहा आग विझविण्याचे कार्य करत आहेत. बजेन्द्र कुमार हा कंत्राटी कामगार असल्याची माहिती मिळत आहे.  या आगीची सखोल चौकशी करण्यात येणार असून अद्याप आगीचे कारण कळू शकलेले नाही. 

Web Title: INS Vishakhapatnam warship break out big fire, one worker dead