पावसाळी आजारांची माहिती मोबाइलवर, सार्वजनिक आरोग्य खात्याच्या पुढाकारातून अॅपची निर्मिती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 19, 2017 02:12 AM2017-09-19T02:12:43+5:302017-09-19T02:12:45+5:30

दुर्लक्ष केल्यास डेंग्यू, मलेरिया, एच१एन१ (स्वाइन फ्लू), लेप्टोपायरोसिस, चिकुनगुन्या यांसारखे पावसाळी आजार जीवघेणे ठरू शकतात. म्हणूनच या आजारांबाबत मुंबईकरांना सर्व माहिती मोबाइलच्या एका क्लिकवर महापालिकेने उपलब्ध करून दिली आहे.

Information about rainy diseases on the mobile, the creation of the app in the initiative of the Public Health Department | पावसाळी आजारांची माहिती मोबाइलवर, सार्वजनिक आरोग्य खात्याच्या पुढाकारातून अॅपची निर्मिती

पावसाळी आजारांची माहिती मोबाइलवर, सार्वजनिक आरोग्य खात्याच्या पुढाकारातून अॅपची निर्मिती

googlenewsNext

मुंबई : दुर्लक्ष केल्यास डेंग्यू, मलेरिया, एच१एन१ (स्वाइन फ्लू), लेप्टोपायरोसिस, चिकुनगुन्या यांसारखे पावसाळी आजार जीवघेणे ठरू शकतात. म्हणूनच या आजारांबाबत मुंबईकरांना सर्व माहिती मोबाइलच्या एका क्लिकवर महापालिकेने उपलब्ध करून दिली आहे. यासाठी एक विशेष अ‍ॅप तयार करण्यात आले आहे.
‘मान्सून रिलेटेड डिसीज’ या नावाच्या या अ‍ॅपवर पावसाळी आजारांबद्दलची माहिती, आजार होऊ नये म्हणून घेण्याची खबरदारी, आजार झाल्यास काय काळजी घ्यावी याबद्दलची माहिती देण्यात आली आहे. तसेच पालिकेचे दवाखाने व रुग्णालये यांचे संपर्क क्रमांक आणि पत्तेही देण्यात
आले आहेत.
डेंग्यू, मलेरिया, एच१एन१ (स्वाइन फ्लू), लेप्टोस्पायरोसिस, चिकुनगुन्या यांसारख्या आजारांबाबत इंटरनेटवर माहिती उपलब्ध आहे. मात्र, ही माहिती शास्त्रशुद्ध असेलच असे नाही. ही बाब लक्षात घेऊन महापालिकेच्या वरिष्ठ डॉक्टरांनी व संबंधित तज्ज्ञांनी या आजारांबाबत शास्त्रशुद्ध माहिती देणारे अ‍ॅप तयार केले आहे.
यामध्ये आजाराबद्दलची सविस्तर माहिती, आजाराचा प्रसार कसा होतो व त्याची कारणे काय? प्रसार रोखण्यासाठी काय काळजी घ्यावी? काय करावे व काय करू नये? अशी सर्व माहिती देण्यात आली आहे. लोकमान्य टिळक सर्वसाधारण रुग्णालयातील ‘सामुदायिक औषध विभाग’ व कांदिवली परिसरातील ‘ठाकूर इन्स्टिट्यूट आॅफ मॅनेजमेंट स्टडीज’ यांच्या पुढाकाराने सार्वजनिक आरोग्य खाते व कीटकनाशक खाते यांच्या मदतीने हे अ‍ॅप तयार करण्यात आले आहे.
>आजाराची लक्षणे कोणती, आजार झाल्यास काय काळजी घ्यावी? याची माहिती यामध्ये आहे. तसेच आजार झाल्यास वैद्यकीय उपचारांसाठी महापालिकेचे दवाखाने व रुग्णालये यांचे विभागनिहाय संपर्क क्रमांक/पत्ते देण्यात आले आहेत. प्रतिबंधात्मक उपाययोजनांच्या दृष्टीने कीटकनाशक खात्याचेही संपर्क क्रमांक उपलब्ध करून देण्यात आले आहेत.
अ‍ॅपमध्ये आजाराबद्दलची सविस्तर माहिती, आजाराचा प्रसार कसा होतो व त्याची कारणे काय? प्रसार रोखण्यासाठी काय काळजी घ्यावी? काय करावे व काय करू नये? याची माहिती देण्यात आली आहे.
मंगळवारी सायन येथील लोकमान्य टिळक महापालिका सर्वसाधारण रुग्णालयात आयोजित ‘निरंतर वैद्यकीय शिक्षण’ कार्यक्रमादरम्यान या अ‍ॅपचे लोकार्पण करण्यात येणार आहे.

Web Title: Information about rainy diseases on the mobile, the creation of the app in the initiative of the Public Health Department

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.