उच्चभ्रू वसाहत म्हणून साऱ्यांचेच दुर्लक्ष

By admin | Published: September 23, 2014 12:06 AM2014-09-23T00:06:11+5:302014-09-23T00:06:11+5:30

पश्चिम प्रभाग : समस्या सोडविण्याबाबत उदासीनता

Ignore Saras as the elite colony | उच्चभ्रू वसाहत म्हणून साऱ्यांचेच दुर्लक्ष

उच्चभ्रू वसाहत म्हणून साऱ्यांचेच दुर्लक्ष

Next

 नाशिक : तळागाळातील जो वर्ग आपल्या समस्यांविषयी जागरूक असतो त्याकडे यंत्रणेचे चटकन लक्ष जाते; परंतु जेथे सुखवस्तू लोक राहतात आणि जे आपल्या कामानिमित्ताने अशा समस्यांकडे लक्ष वेधू शकत नाहीत अशा भागाकडे लक्ष देण्याची गरजच नाही, असेच जणू पालिकेने आणि पश्चिम प्रभागातील नगरसेवकांनी ठरवून टाकले आहे. त्यामुळेच की काय, कॉलेजरोड, गंगापूररोड असो अथवा त्र्यंबकरोड, नागरिकांच्या समस्यांविषयी कोणीही दखल घेत नाही. गेल्या अडीच वर्षांपासून पालिकेत पंचवार्षिक कारकीर्द सुरू आहे. अनेक ठिकाणी तर तेच ते नगरसेवक अनेक वर्षांपासून आहेत; परंतु लोक आपल्याला निवडून देतात म्हणजे आपले काम चांगलेच आहे, आता अधिक वेगळे काही करण्याची गरज नाही, अशा आविर्भावात येथील नगरसेवक असतात.
प्रभाग सभांचा काय उपयोग?
महापालिकेच्या पश्चिम प्रभाग समितीच्या बैठका होत असतात. त्यात नगरसेवकांची हजेरी बऱ्यापैकी असते. मात्र फुटकळ विषयांवरील चर्चांव्यतिरिक्त काहीच निष्पन्न झालेले नाही. याच सभेत अनियमित घंटागाड्यांचा ठेका रद्द करणे, तसेच झाडांच्या फांद्या तुटल्यानंतर पालिकेने उद्यान विभागाची गाडी पाठविणे अशा अनेक विषयांवर चर्चा करण्यात आली; परंतु एकाही निर्णयाची अंमलबजावणी झालेली नाही.

Web Title: Ignore Saras as the elite colony

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.