खरं नाही वाटत, माझा पुत मला सोडून गेला!

By ऑनलाइन लोकमत | Published: January 23, 2019 02:35 AM2019-01-23T02:35:13+5:302019-01-23T02:35:19+5:30

‘मला खरं नाही वाटत, माझा पुत मला सोडून गेलाय... शेवटचा भेटलापण नाही, आता मी काय करू?’ असं म्हणत त्या माउलीने एकच हंबरडा फोडला.

I do not think that, my power has left me! | खरं नाही वाटत, माझा पुत मला सोडून गेला!

खरं नाही वाटत, माझा पुत मला सोडून गेला!

Next

गौरी टेंबकर - कलगुटकर 
मुंबई : ‘मला खरं नाही वाटत, माझा पुत मला सोडून गेलाय... शेवटचा भेटलापण नाही, आता मी काय करू?’ असं म्हणत त्या माउलीने एकच हंबरडा फोडला. तर अंथरुणाला खिळलेल्या वडिलांनाही अश्रू अनावर झाले. हे सगळे वातावरण होते नीलेश रोहिदास पेडणेकर (३९) यांच्या घरातले. कर्नाटकमधील कारवारच्या समुद्रात सोमवारी दुपारी बोट उलटून घडलेल्या दुर्घटनेत त्यांच्यावर काळाने घाला घातला. यामुळे कारवार भंडारी समाज आणि अख्ख्या नागरी निवारा परिसरात शोककळा पसरली आहे.
गोरेगाव पूर्वच्या नागरी निवारा येथे प्लॉट क्रमांक ८ मधील तिसऱ्या मजल्यावर पेडणेकर हे त्यांची आई, वडील, पत्नी नेहा (३६) आणि दोन मुले ईशिता (७) आणि नैतिक (५) यांच्यासोबत राहत होते. त्यांचा कॅटरिंगचा व्यवसाय होता. गोरेगावात टाकलेल्या एका स्टॉलवरच त्यांच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह चालायचा. कारवारमध्ये नरसिंव्हा देवाच्या कुरुमगड जत्रेसाठी रविवारी रात्री ते पत्नीसह कारवारला जायला निघाले. त्यानंतर सोमवारी दुपारी कारवार समुद्रात जवळपास ३३ भाविकांना जत्रेसाठी घेऊन निघालेली बोट उलटून हा अपघात घडला. सोमवारीच या अपघाताबाबत पेडणेकर यांचे नातेवाईक तसेच शेजाºयांना समजले. पण अंथरुणाला खिळलेले वृद्ध वडील आणि नुकतीच डोळ्यांची शस्त्रक्रिया झालेल्या आईला याबाबत सांगण्याची हिंमत ते करू शकत नव्हते. अखेर मंगळवारी पेडणेकर यांचा मृतदेह मुंबईत आणण्याच्या काही तास आधी शेजाºयांनी याबाबत त्यांना सांगितले. मात्र आपला एकुलता एक कमवता मुलगा आपल्याला कायमचा सोडून गेला, त्याची पत्नी आणि दोन मुले वाºयावर पडलीत यावर त्यांच्या आईचा विश्वासच बसत नव्हता. मुख्य म्हणजे आपले बाबा आता कधीच परतणार नाहीत, याची पुसटशी कल्पनादेखील लहानग्या नैतिक आणि ईशिताला नव्हती.
तरुण मुलाच्या जाण्याने हतबल झालेले रोहिदास हे मुलाच्या मार्गावर डोळे लावून बसले होते. तो येईल आणि आपल्याला आवाज देईल अशी खोटी आशा उराशी बाळगत स्वत:चीच समजूत काढत होते. त्यामुळे एकंदरच हे सर्व दृश्य काळीज पिळवटून टाकणारे होते. पेडणेकर यांचा मृतदेह त्यांच्या घरी आणल्यानंतर दुपारी ४ च्या सुमारास गोरेगाव चेकनाका येथील शिवधाम स्मशानभूमीत जड अंतकरणाने त्यांना अखेरचा निरोप देण्यात आला. या वेळी कारवार जिल्हा भंडारी संघाचे सदस्य तसेच अन्य नातेवाइक मोठ्या संख्येने या ठिकाणी उपस्थित होते.
एक ‘कॉल’ मृत्यूचा!
पेडणेकर हे त्यांच्या नातेवाइकांसोबत आधीच्या बोटीत चढणार होते. मात्र त्याच वेळी त्यांना एक फोन आला आणि फोनवर बोलत ते किनाºयावरच थांबले.
त्यानंतर दुसरी बोट त्यांनी पकडली आणि त्यात त्यांचा मृत्यू झाला. त्यामुळे जणू मृत्यूनेच त्यांना ‘कॉल’ करत थांबवून घेतले, अशी चर्चा त्यांच्या नातेवाइकांमध्ये होती.

Web Title: I do not think that, my power has left me!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.