बारावीच्या विद्यार्थ्यांना बायोमेट्रिक हजेरी!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 16, 2018 06:58 AM2018-06-16T06:58:49+5:302018-06-16T06:58:49+5:30

खासगी क्लासेसवर नियंत्रण आणण्यासाठी अकरावी व बारावीच्या विद्यार्थ्यांना त्यांच्या कनिष्ठ महाविद्यालयांत बायोमेट्रिक हजेरी बंधनकारक करण्यात आली आहे.

 HSC students get biometric attendance! | बारावीच्या विद्यार्थ्यांना बायोमेट्रिक हजेरी!

बारावीच्या विद्यार्थ्यांना बायोमेट्रिक हजेरी!

googlenewsNext

मुंबई - खासगी क्लासेसवर नियंत्रण आणण्यासाठी अकरावी व बारावीच्या विद्यार्थ्यांना त्यांच्या कनिष्ठ महाविद्यालयांत बायोमेट्रिक हजेरी बंधनकारक करण्यात आली आहे. तसा आदेश शिक्षण विभागाने शुक्रवारी जारी केल्याने कॉलेज बंक करण्यास चाप बसेल व महाविद्यालयांशी हातमिळवणी करून ‘इंटिग्रेटेड’ क्लासेस चालविणाऱ्यांना वेसण घातली जाईल.
ही योजना यंदा मुंबई, पुणे, नाशिक, औरंगाबाद, नागपूर या विभागांतील ज्युनिअर कॉलेजांत (विज्ञान शाखा) सुरू करण्यासाठी यंत्रसामग्री एका महिन्यात गोळा करायची आहे. अंमलबजावणीचा अहवाल शिक्षणाधिकाºयांनी सरकारला सादर करायचा आहे. महाविद्यालयांना अचानक भेट देऊन हजेरीचा आढावा घ्यायचा आहे. अंमलबजावणी न करणाºयांवर कार्यवाही केली जाणार आहे.
विज्ञान शाखेचे विद्यार्थी क्लासमध्ये जाण्यासाठी नियमित वर्गांना हजर न राहता फक्त प्रात्यक्षिकांना हजर राहतात, असे निदर्शनास आले. काही महाविद्यालयांनी तर क्लासेसशी करार केला आहे. त्यास आळा घालण्यासाठी सरकारने ‘बायोमेट्रिक’चा निर्णय घेतला आहे.

क्लास-कॉलेजचे टायअप तोडा
आपल्या क्लासमध्येच बायोमेट्रिक मशीन्स बसवून तेथील हजेरी कॉलेज प्रशासनास देतील आणि तीच हजेरी महाविद्यालये दाखवतील, अशी अशी शक्यता व्यक्त केली जात आहे. त्यामुळे क्लासेस व कॉलेज प्रशासन यांच्यातील टायपअ तोडण्यात यावे, प्रसंगी अशा कॉलेजेसची मान्यता रद्द करावी, असे महाराष्ट्र कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक महासंघाने म्हटले आहे.

Web Title:  HSC students get biometric attendance!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.