भाजपाच्या शिवार संवाद यात्रेला किती लोक होते?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 18, 2017 05:56 AM2017-08-18T05:56:41+5:302017-08-18T05:56:42+5:30

आजवर शेतक-यांच्या कर्जमाफीचा विरोध करणा-या मुख्यमंत्र्यांना विरोधकांच्या संघर्षयात्रेमुळेच कर्जमाफीचा निर्णय घ्यावा लागला.

How many people were in the BJP's Shivar dialogue? | भाजपाच्या शिवार संवाद यात्रेला किती लोक होते?

भाजपाच्या शिवार संवाद यात्रेला किती लोक होते?

Next

मुंबई : आजवर शेतक-यांच्या कर्जमाफीचा विरोध करणा-या मुख्यमंत्र्यांना विरोधकांच्या संघर्षयात्रेमुळेच कर्जमाफीचा निर्णय घ्यावा लागला. फडणवीसांच्या काळात शेतक-यांना संप करावा लागला. संघर्ष यात्रेत किती लोक होते, अशी विचारणा करण्याऐवजी भाजपच्या शिवार संवाद यात्रेला किती लोक होते ते मुख्यमंत्र्यांनी जनतेला सांगावे, असे आवाहन काँग्रेस प्रदेशाध्यक्ष खा. अशोक चव्हाण यांनी
टिळक भवन येथे पत्रकारांशी बोलताना केले.
भाजपा कार्यकारिणीच्या समारोप सत्रात बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विरोधकांवर चांगलेच तोंडसुख घेतले. त्यावर खा. चव्हाण यांनी मुख्यमंत्र्यांच्या भाषणाचा समाचार घेतला. ते म्हणाले, विरोधी पक्षांसह सुकाणू समितींवर मुख्यमंत्र्यांनी ज्या भाषेत टीका केली, त्यातून सत्तेचा अहंकार दिसून येतो. तीन महीने झाले तरी मुख्यमंत्र्यांना संघर्ष यात्रेवर टीका करावी लागते यातच सर्व काही आले. काँग्रेस पक्षाने कर्जमाफीचे खोटे आकडे आणि सरकारचा शेतकरी विरोधी चेहरा जनतेसमोर उघडा पाडल्यामुळे फडणवीस यांचा त्रागा सुरु आहे.
राज्यातील शेतकºयांचा सरकारवर विश्वास राहिलेला
नाही. सरकार शेतकºयांना कर्जमाफी मिळावी म्हणून प्रयत्न करते आहे
की, कर्जमाफीचा लाभ मिळू नये म्हणून जाचक अटी व शर्ती घालत आहे? या सरकारचा कारभार पाहता हे सरकार शेतकºयांच्या जीवावर उठले आहे, असा आरोपही खा. चव्हाण यांनी केला.
>हवेवरचे सरकार
राज्य सरकारने कर्जमाफीची घोषणा करूनही शेतकरी आत्महत्यांचे सत्र थांबलेले
नाही. गेल्या ७ दिवसात ३४ शेतकºयांनी आत्महत्या केल्या आहेत. यावरून हे सरकार शेतकरी आत्महत्यांबाबत किती असंवेदनशील आहे हे स्पष्ट होते. हवेवर आलेले आणि हवेत असलेले हे सरकार कधी हवेत विरून जाईल हे कळणारही नाही, अशी टीका खा. अशोक चव्हाण यांनी केली.

Web Title: How many people were in the BJP's Shivar dialogue?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.