नानकटाई बनविण्यासाठी गृहिणींची लगबग  

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 16, 2017 07:25 AM2017-10-16T07:25:21+5:302017-10-16T07:25:38+5:30

दिवाळीची तयारी अंतिम टप्प्यात येऊन पोहोचली आहे. बाजारपेठांमध्ये जशी रेडीमेड फराळाला मागणी आहे, त्याचप्रमाणे मध्यमवर्गीयांच्या घरी फराळ बनविण्यासही पसंती दिली जाते. याच फराळातील नानकटाई बनविण्यासाठी सध्या शहर-उपनगरातील

 Housewife's longevity to make nankatai | नानकटाई बनविण्यासाठी गृहिणींची लगबग  

नानकटाई बनविण्यासाठी गृहिणींची लगबग  

Next

मुंबई : दिवाळीची तयारी अंतिम टप्प्यात येऊन पोहोचली आहे. बाजारपेठांमध्ये जशी रेडीमेड फराळाला मागणी आहे, त्याचप्रमाणे मध्यमवर्गीयांच्या घरी फराळ बनविण्यासही पसंती दिली जाते. याच फराळातील नानकटाई बनविण्यासाठी सध्या शहर-उपनगरातील बेकरींमध्ये गृहिणींची लगबग दिसून येत आहे. घरातून मैदा आणि साखरेचे पीठ घेऊन येत बेकरींच्या परिसरात बसून विविध रंगांची अन् विविध चवींची नानकटाई बनविताना दिसत आहे.
गेल्या काही वर्षांच्या तुलनेत घराघरांत होणारा फराळ कमी झाला. मात्र अजूनही गिरणगाव, गिरगाव, दादर अशा चाळ संस्कृती आणि मध्यमवर्गीयांच्या घरात फराळासाठी महिला रात्रंदिवस झटतात. यंदाही गेल्या वर्षीच्या तुलनेत बेकरीतील ट्रेची किंमत दहा रुपयांनी वाढली आहे. नानकटाई करण्याचा मध्यमवर्गीयांचा उत्साह कमी झालेला नाही.
लोअर परळ येथील बेकरीत नानकटाई करण्यासाठी आलेल्या राजश्री कैवारी यांना विचारले असताना त्यांनी सांगितले की, गेल्या वर्षीपेक्षा यंदा येथील नानकटाईच्या ट्रेची किंमत पाच रुपयांनी वाढली आहे. महागाई वाढली असली तरी आपला सण आहे, तो साजरा करणारच. काही वर्षांपूर्वी ५ किलो नानकटाई बनवायचो, यंदा महागाईमुळे दोन किलोच करणार आहोत. पण दिवाळी साजरी करणार असे त्यांनी सांगितले.
बेकरीच्या मालकाने सांगितले की, महागाई, वस्तू सेवा कर आणि रेडीमेड फराळाकडे वळणारा वर्ग यामुळे मागच्या २-३ वर्षांपासून ग्राहकांचे प्रमाण कमी झाले आहे. आजही या परिसरातील मध्यमवर्गीय घरांतील महिला आवर्जून नानकटाई करण्यासाठी येथे येतात. या ठिकाणी चॉकलेट्स, व्हॅनिला, खाण्याचे रंग मिसळून विविधरंगी अशी अनेक प्रकारची नानकटाई बनविली जाते.
बेकरीच्या मालकाने सांगितले की, महागाई, वस्तू सेवा कर आणि रेडीमेड फराळाकडे वळणारा वर्ग यामुळे मागच्या २-३ वर्षांपासून ग्राहकांचे प्रमाण कमी झाले आहे. आजही मध्यमवर्गीय घरांतील महिला आवर्जून नानकटाई करण्यासाठी येथे येतात.

Web Title:  Housewife's longevity to make nankatai

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Divaliदिवाळी