नर्सिंग कॉलेजची रुग्णालये कागदावरच, राज्यातील चित्र

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 6, 2018 04:46 AM2018-01-06T04:46:13+5:302018-01-06T04:46:32+5:30

राज्यातील बहुसंख्य नर्सिंग महाविद्यालयांनी केवळ कागदावरच रुग्णालये उभारली असल्यामुळे नर्सिंगचे विद्यार्थी/विद्यार्थिनी प्रात्यक्षिकाच्या अनुभवापासून वंचित राहत आहेत.

Hospitals in nursing colleges, pictures of the state | नर्सिंग कॉलेजची रुग्णालये कागदावरच, राज्यातील चित्र

नर्सिंग कॉलेजची रुग्णालये कागदावरच, राज्यातील चित्र

Next

- विशेष प्रतिनिधी
मुंबई - राज्यातील बहुसंख्य नर्सिंग महाविद्यालयांनी केवळ कागदावरच रुग्णालये उभारली असल्यामुळे नर्सिंगचे विद्यार्थी/विद्यार्थिनी प्रात्यक्षिकाच्या अनुभवापासून वंचित राहत आहेत.
प्रत्येक नर्सिंग कॉलेजने तीन वर्षांनंतर १०० ते १५० खाटांचे स्वत:चे रुग्णालय उभारावे, अशी शासनाची अट आहे. या अटीवर राज्यात अनेक कॉलेजेस उघडली गेली आहेत.
राज्यात आरएएनएम आणि आजीएनएम या नर्सिंग अभ्यासक्रमाचे अनुक्रमे ४३७ आणि २४४ कॉलेजेस आहेत. ती खासगी संस्थांद्वारे चालविली जातात. या कॉलेजेसना स्थापनेच्या तीन वर्षांपर्यंत स्थानिक शासकीय रुग्णालयांचा वापर विद्यार्थ्यांच्या प्रात्यक्षिकांसाठी करता येईल पण त्यानंतर त्यांना स्वत:चे रुग्णालय उभारावे लागेल, असा जीआर सार्वजनिक आरोग्य विभागाने १८ सप्टेंबर २०१२ रोजी काढला होता.
या सक्तीमुळे बहुतेक महाविद्यालयांनी रुग्णालयांची नोंदणी केली आणि थातुरमातुर रुग्णालय दाखविले. फक्त तपासणीच्या वेळी त्या ठिकाणी रुग्ण दाखविले जातात.
नर्सिंग कॉलेजना त्यांचे रुग्णालय उभारण्याची सक्ती करणारा जीआर तातडीने रद्द करावा, अशी मागणी संस्थाचालकांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे.

ऐपत नसताना कॉलेज कशासाठी?

जीआरमुळे या बनवाबनवीस नर्सिंग कॉलेजना बाध्य व्हावे लागते, असे संस्था चालकांचे म्हणणे आहे़ स्वत:चे रूग्णालय उभारून विद्यार्थ्यांच्या प्रात्यक्षिकांची व्यवस्था करण्याची ऐपत नसलेल्या संस्थांनी कॉलेज चालवावीत कशासाठी, असा सवाल आरोग्य विभागाने केला आहे़

Web Title: Hospitals in nursing colleges, pictures of the state

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.