‘...तर रुग्णालयावरील हल्ले कमी होतील!’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 5, 2017 02:46 AM2017-12-05T02:46:10+5:302017-12-05T02:46:10+5:30

राज्यातील प्रत्येक रुग्णालयातील प्रशासनाने कर्मचाºयांना रुग्णांसह त्यांच्या नातेवाइकांना हाताळण्याचे प्रशिक्षण दिले, तर रुग्णालयांवरील हल्ले होण्याचे प्रमाण नक्कीच कमी होईल

'... the hospital attacks will be reduced!' | ‘...तर रुग्णालयावरील हल्ले कमी होतील!’

‘...तर रुग्णालयावरील हल्ले कमी होतील!’

Next

मुंबई : राज्यातील प्रत्येक रुग्णालयातील प्रशासनाने कर्मचाºयांना रुग्णांसह त्यांच्या नातेवाइकांना हाताळण्याचे प्रशिक्षण दिले, तर रुग्णालयांवरील हल्ले होण्याचे प्रमाण नक्कीच कमी होईल, असा विश्वास राज्याचे सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री डॉ. दीपक सावंत यांनी व्यक्त केला आहे. मुंबईमध्ये पार पडलेल्या आंतरराष्ट्रीय रुग्ण सर्वेक्षण परिषदेत ते बोलत होते.
सावंत म्हणाले की, रुग्ण सुरक्षिततेवर अशा प्रकारच्या परिषदांचे आयोजन गरजेचे आहे. देशात दररोज सुमारे ६ लाख लोकांवर उपचार केले जातात. त्यात किफायतशीरता व सुरक्षा हा सर्वांसाठीच चिंतेचा विषय आहे. यामध्ये रुग्णालयाने कारकुनी काम कमी करत कागदपत्रांपेक्षा रुग्णांच्या सुरक्षिततेकडे अधिक लक्ष देण्याची गरज आहे. त्यासाठी केवळ रुग्णच नव्हे, तर त्यांच्या कुटुंबीयांनाही हाताळण्याचे प्रशिक्षण रुग्णालयाने त्यांच्या कर्मचाºयांना द्यायला हवे. जेणेकरून रुग्ण, रुग्णाचे नातेवाईक व कर्मचारी यांवर ताण येणार नाही. तसेच रुग्णालयांवरील हल्ल्यांचे प्रमाण कमी होईल. या वेळी मुंबईच्या डबेवाल्यांनी सातत्य व गुणवत्ता राखण्याबाबतचे खास सादरीकरण केले. त्यांच्या मॉडेलमधील विविध गोष्टींवर परिषदेत चर्चा करण्यात आली. दरम्यान, ‘रुग्णांची सुरक्षा व गुणवत्ता सुधारणेत फिजिशिअनची भूमिका’ आणि ‘रुग्णांच्या सुरक्षेत सुधारणा करण्यासाठी संधींचा वेध घेणारी माहिती’ या विषयांवर परिषदेत सविस्तर चर्चा झाली.

Web Title: '... the hospital attacks will be reduced!'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.