हेचि दान देगा देवा... तुझा विसर न व्हावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 13, 2019 12:37 AM2019-07-13T00:37:38+5:302019-07-13T00:38:04+5:30

मुंबापुरी रंगली पांडुरंगा चरणी : पोलीस, स्वयंसेवी संस्थांकडून गर्दीचे नियोजन

He will give charity to God ... Do not forget you | हेचि दान देगा देवा... तुझा विसर न व्हावा

हेचि दान देगा देवा... तुझा विसर न व्हावा

Next

मुंबई : आषाढी एकादशीनिमित्त राज्यभरातून लाखो वारकरी विठुमाउलीला भेटण्यासाठी पंढरपुरात दाखल झाले होते. मुंबापुरीतील काही भाविकांना पंढरपुरात जाणे शक्य झाले नाही. असे भाविक प्रति पंढरपूर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या वडाळा येथील विठ्ठल-रखुमाई मंदिरात विठ्ठलाच्या चरणी नतमस्तक झाले.


आषाढीनिमित्त प्रति पंढरपूर मंदिर रोशणाईने उजळून निघाले होते. विठ्ठलाचे दर्शन घेण्यासाठी हजारोंच्या संख्येने भाविकांनी रांगा लागल्या होत्या. मुंबई, ठाणे, रायगड या जिल्ह्यांमधून भाविक वडाळा येथे दाखल झाले होते. प्रत्येकाच्या मुखी विठ्ठलाचे नाव होते. यासह ‘माउली, माउली रूप तुझे’, ‘हेचि दान देगा देवा... तुझा विसर न व्हावा’ या अभंगाने विठ्ठलनामाचा गजर मुंबापुरीत दुमदुमत होता.
सर्वत्र हरिनामाचा गजर केला जात होता. संतांच्या पालख्या मंदिर परिसरात दाखल होत होत्या. त्यामुळे शहर आणि उपनगरात गर्दी वाढली होती. भाविकांना विठ्ठलाचे दर्शन योग्यरीत्या घेता यावे, यासाठी नियोजनबद्ध व्यवस्था केली होती. पोलीस प्रशासन आणि स्वयंसेवी संघटनांच्या माध्यमातून गर्दीचे नियोजन केले जात होते़ अनेक स्वयंसेवी संस्थांच्या वतीने भाविकांना पाणी, साबुदाणा वडा, खिचडी यांचे दान केले गेले.



सायनमध्ये अवतरले ‘बाल’ विठ्ठल-रखुमाई
च्आषाढी एकादशीनिमित्त पंढरपुरासह राज्यभरात विठुरायाचा गजर होत असताना सायनमध्ये ‘बाल’ विठ्ठल-रखुमाई अवतरले आणि रस्त्यावरून जाणाºया मुंबईकरांनी ‘माउली’ म्हणत नकळत हात जोडले. निमित्त होते शिव शिक्षण संस्थेच्या डी.एस. हायस्कूलमधील विद्यार्थ्यांच्या दिंडीचे.
च्गेल्या ५० हून अधिक वर्षांपासून डी.एस. हायस्कूलमध्ये आषाढी एकादशीच्या दिवशी वारीनिमित्त दिंडी आयोजित केली जाते. ‘ज्ञानोबा माउली तुकाराम’च्या गजरात ही लहान मुलांची दिंडी शाळेपासून सायनमधील श्री विठ्ठल मंदिरापर्यंत जाते. यानिमित्त पूर्व प्राथमिक आणि प्राथमिक वर्गातील विद्यार्थी-विद्यार्थिनी धोतर, टोपी, लुगडे नेसून वारकरी म्हणून सहभागी होतात. दिंडी-वारीमुळे विद्यार्थ्यांना आपल्या मराठमोळ्या संस्कृतीची तर मिळतेच, पण यानिमित्ताने विद्यार्थी कीर्तने सादर करतात, अशी माहितीअध्यक्ष राजेंद्र प्रधान यांनी दिली.

अंधेरी पश्चिमेस पर्यावरणप्रेमींची व एकता मंचची वृक्षदिंडी
च्पर्यावरणाचे महत्त्व जनसामान्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी एकता मंच व इतर संस्थांच्या वतीने वृक्षदिंडीचे आयोजन १३ जुलै रोजी करण्यात आले आहे. ‘झाडे लावा, झाडे जगवा’ या संदेशाचे बीज विद्यार्थ्यांच्या मनात रुजविण्यासाठी सुमारे ५ हजार शाळा, महाविद्यालयांचे विद्यार्थी दिंडीत सहभागी होणार आहेत.


च्अंधेरी येथील महानगरपालिका कार्यालय येथून सकाळी ९ च्या सुमारास दिंडी निघेल. त्यानंतर एस.व्ही. रोडवरून दिंडी परिक्रमा करेल व हंजर सिनेमा मैदानात समाप्त होईल. कार्यक्रमात पर्यावरणप्रेमी नागरिकांना वृक्ष रोपट्याचे वाटप करण्यात येणार आहे. पर्यावरणाचे संतुलन राखावे व त्यांचे महत्त्व सर्वदूर पसरविण्यासाठी घोषणा देत व पर्यावरणाबाबत जनजागृती करण्यासाठी फलक घेऊन विद्याथी सहभागी होतील. कार्यक्रमात अभिनेते शक्ती कपूर सहभागी होणार असून कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी एकता मंचचे प्रमुख अजय कौल व त्यांचे सहकारी प्रचंड मेहनत घेत आहेत, असे एकता मंचचे कार्यकर्ते मधुसुदन सदडेकर यांनी सांगितले.

घराच्या प्रश्नावर गिरणी कामगारांनी पांडुरंगाला घातले साकडे
लोकमत न्यूज नेटवर्क :
मुंबई : घराच्या प्रश्नावर गिरणी कामगारांनी प्रति पंढरपूर म्हणून ओळखल्या जाणाºया वडाळाच्या विठ्ठलाचरणी मस्तक ठेवून साकडे घातले. गिरणी कामगार कृती संघटनेच्या वतीने ना. म. जोशी मार्गावरील महाराष्ट्र हायस्कूलच्या मैदानावरून कामगारांची दिंडी काढण्यात आली. गेल्या पाच वर्षांत सरकारने एकही घर बांधलेले नाही. उलट बांधलेली घरे देण्यास चालढकलपणा केला आहे. संतापलेल्या कामगारांनी दिंडीद्वारे विठ्ठलाला साकडे घालण्याचा निर्णय घेतला.
या दिंडीत विविध ठिकाणचे गिरणी कामगार मोठ्या संख्येने सहभागी झाले. मुंबईतील गिरणी कामगारांनी ४०-५० वर्षांपूर्वी अध्यात्म्याच्या प्रेमापोटी गिरणगावात भजनकला जोपासली आणि गिरणगावच्या गल्लीबोळांत, बैठकीच्या खोलीत प्रासादिक भजन मंडळांची स्थापना केली. अनेक भजनांच्या नामांकित भजनी बुवांसह बाºया गिरणगाव रंगू लागल्या. पुढे वडाळ्याच्या प्रतिपंढरपूरला पांडुरंगाच्या भेटीला दिंडीद्वारे जाण्याची प्रथा तेथूनच जन्माला आली.
कामगार संघटना जवळपास १७-१८ वर्षे घराच्या प्रश्नावर लढत आहेत. आज १ लाख ७५ हजार गिरणी कामगारांनी अर्ज भरले आहेत. त्यापैकी आतापर्यंत फक्त ११ हजार कामगारांना घरे मिळाली आहेत. उर्वरित कामगारांना घरे कधी मिळणार, असा प्रश्न गिरणी कामगारांनी या वेळी उपस्थित केला आहे़ दिंडीत राष्ट्रीय मिल मजदूर संघाचे सरचिटणीस गोविंदराव मोहिते, संघटनेच्या समन्वयक जयश्री खाडिलकर-पांडे, सेंच्युरी मिल कामगार एकता मंचचे नंदू पारकर, आदी कामगारनेते अग्रभागी होते.

Web Title: He will give charity to God ... Do not forget you

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.