हार्बर लोकल बोरीवली, विरारपर्यंत धावणार!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 11, 2018 02:48 AM2018-01-11T02:48:15+5:302018-01-11T02:48:28+5:30

मुंबई रेल्वे विकास महामंडळ (एमआरव्हीसी) सध्या बोरीवली-विरारपर्यंत हार्बर मार्ग नेण्यासाठी हालचाल करत आहे. एमयूटीपी-३ नंतर एमयूटीपी-४ची प्रतीक्षा लाखो प्रवाशांना आहे. मात्र, एमयूटीपी-३ चे प्रकल्प जलद गतीने पूर्ण होण्यासाठी एमयूटीपी-३ प्रकल्पाचे दोन भाग करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

Harbor Local will run till Borivali, Virar | हार्बर लोकल बोरीवली, विरारपर्यंत धावणार!

हार्बर लोकल बोरीवली, विरारपर्यंत धावणार!

Next

- महेश चेमटे

मुंबई : मुंबई रेल्वे विकास महामंडळ (एमआरव्हीसी) सध्या बोरीवली-विरारपर्यंत हार्बर मार्ग नेण्यासाठी हालचाल करत आहे. एमयूटीपी-३ नंतर एमयूटीपी-४ची प्रतीक्षा लाखो प्रवाशांना आहे. मात्र, एमयूटीपी-३ चे प्रकल्प जलद गतीने पूर्ण होण्यासाठी एमयूटीपी-३ प्रकल्पाचे दोन भाग करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यानुसार, एमयूटीपी-३ अ मध्ये हार्बर थेट विरारपर्यंत नेण्यात येणार आहे. रेल्वेमंत्री पीयूष गोयल यांच्या मुंबई दौºयात यावर चर्चा होऊन याला मंजुरी मिळण्याची शक्यता आहे.
शहराच्या लाइफ लाइन संदर्भात प्रकल्पांसाठी मुंबई शहर वाहतूक प्रकल्प (एमयूटीपी-३) मोलाची भूमिका पार पाडत आहे. नवीन घोषणा न करता, सध्या सुरू असलेला प्रकल्प तातडीने मार्गी लावा, असे आदेश रेल्वेमंत्री गोयल यांनी दिले होते. त्यानुसार, एमआरव्हीसीकडून एमयूटीपी-३ चे दोन भाग करून काम पूर्णत्वास नेण्याचे मनसुबे आहेत. एमयूटीपी ३ अ अंतर्गत हार्बर मार्गाचे विस्तारिकरण करण्यात येणार आहे. गोरेगाव-बोरीवली आणि बोरीवली-विरार अशा टप्प्याने हार्बर मार्ग कार्यान्वित होईल, अशी माहिती एमआरव्हीसीच्या सूत्रांनी दिली.
एमयूटीपी-३ मध्ये एलिव्हेटेड प्रकल्पांचा समावेश आहे. परिणामी, एमयूटीपी-३ अ मध्ये सर्व एलिव्हेटेड प्रकल्प एक त्र करण्यात आले आहेत. हे एकत्र केलेले प्रकल्प मंजुरीसाठी रेल्वे बोर्डात पाठविण्यात आले आहेत. सध्या सुरू असलेल्या शहरातील विकासकामे लक्षात घेत, ‘आवश्यकते’नुसार एलिव्हेटेड प्रकल्पांवर प्रवाशांभिमुख निर्णय घेण्यात येईल. विनाकारण खर्च करण्यापेक्षा तो निधी अन्य कामांसाठी वळविण्यात येईल, असे सूचक वक्तव्य रेल्वे बोर्डातील अधिकाºयांनी केले.
लवकरच रेल्वेमंत्री पीयूष गोयल मुंबई दौºयावर येणार आहेत. मुंबई दौºयात आल्यावर एमआरव्हीसीचे वरिष्ठ अधिकारी शहरांतील सुरू असलेल्या प्रकल्पांची सद्यस्थिती मांडतील. त्याचबरोबर, एमयूटीपी-३ अ प्रकल्पावर चर्चा होईल. या वेळीच रेल्वेमंत्री या प्रकल्पाला मंजुरी देण्याची शक्यता आहे.

लवकरच हिरवा झेंडा
- हार्बर मार्ग गोरेगावपर्यंत पूर्ण झाला आहे. या मार्गावर चाचणी पार पडली. प्रत्यक्षात लोकल धावण्यास केवळ रेल्वेसुरक्षा आयोगाची परवानगी आवश्यक आहे.
- पश्चिम रेल्वेने परवानगीसाठी कागदपत्रे आयोगाकडे पाठविले आहेत. लवकरच गोरेगावपर्यंत लोकल धावण्यास हिरवा झेंडा दाखविण्यात येईल.

Web Title: Harbor Local will run till Borivali, Virar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.