गृह खरेदीत ग्राहकांचा आखडता हात

By ऑनलाइन लोकमत | Published: November 10, 2018 07:21 AM2018-11-10T07:21:31+5:302018-11-10T07:21:40+5:30

पाडव्याच्या अर्ध्या मुहूर्तावर गृह खरेदीला पुन्हा एकदा अच्छे दिन येण्यासाठी विकासकांनी ग्राहकांवर सवलतींचा वर्षाव केला. त्यात परवडणाऱ्या आणि स्मार्ट घरांना ग्राहकांनी पसंती दर्शवली आहे.

 Hands on customers' buying in the home | गृह खरेदीत ग्राहकांचा आखडता हात

गृह खरेदीत ग्राहकांचा आखडता हात

googlenewsNext

- चेतन ननावरे
मुंबई - पाडव्याच्या अर्ध्या मुहूर्तावर गृह खरेदीला पुन्हा एकदा अच्छे दिन येण्यासाठी विकासकांनी ग्राहकांवर सवलतींचा वर्षाव केला. त्यात परवडणाऱ्या आणि स्मार्ट घरांना ग्राहकांनी पसंती दर्शवली आहे. मात्र दिवाळीतील धनत्रयोदशीसह पाडव्याच्या मुहूर्तावर झालेली विक्री पाहता अद्यापही ग्राहकराजाने गृह खरेदीत आखडता हात घेतल्याची प्रतिक्रिया बिल्डर्स असोसिएशन आॅफ इंडियाचे सदस्य आनंद गुप्ता यांनी व्यक्त केली.
गुप्ता म्हणाले की, ग्राहकांची मानसिकता अद्यापही बदललेली नाही. दिवाळीच्या मुहूर्तावर नव्या प्रकल्पांची घोषणा कमीच झाल्याची माहिती आहे. पूर्वीच्याच घरांना विकण्यासाठी विकासकांना मेहनत घ्यावी लागत आहे. लोक अद्यापही घरांच्या किमती कमी होण्याच्या प्रतीक्षेत आहेत. त्यात महारेराच्या नियमावलीमुळे गुंतवणूकदारांकडून नव्या प्रकल्पांत गुंतवणूक करण्याकडे पाठ फिरवली जात आहे.
अशा परिस्थितीत जुन्याच घरांची खरेदी-विक्री मोठ्या प्रमाणात सुरू आहे. त्यामुळे रिअल इस्टेट क्षेत्रात अच्छे दिन येण्याचा मुहूर्त अद्यापही मिळालेला नाही.
दरवर्षी दसरा आणि दिवाळीच्या मुहूर्तावर ग्राहक उत्तम प्रकल्पात गुंतवणूक करतात. यंदाही ही परंपरा ग्राहकांनी कायम ठेवल्याचे पाहायला मिळाले.
मुंबईबाहेरील प्रकल्पांना ग्राहकांकडून प्रतिसाद मिळत आहे. उत्तम बांधकामाबरोबर अत्याधुनिक सेवा-सुविधा देणाºया परवडणाºया घरांकडे ग्राहकांचा कल अधिक दिसून येत असल्याची प्रतिक्रिया याबाबत माहिती देताना विकासक अमित हावरे यांनी दिली.
तर, दिवाळीनिमित्त ग्राहकांसाठी विशेष भेट आणि सवलत ठेवल्याने ग्राहकांचा चांगला प्रतिसाद मिळत असल्याची माहिती विकासक रमेश संघवी यांनी दिली.
 

Web Title:  Hands on customers' buying in the home

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Homeघर