गुज्जर आंदोलनाचा फटका; मंगळवारपर्यंत गाड्या रद्द

By ऑनलाइन लोकमत | Published: February 14, 2019 01:22 AM2019-02-14T01:22:32+5:302019-02-14T01:23:04+5:30

गुज्जर आंदोलनामुळे रेल्वेच्या वेळापत्रकावर परिणाम झाला असून, १९ फेब्रुवारीपर्यंत मेल, एक्स्प्रेस रद्द करण्याचा निर्णय पश्चिम रेल्वे प्रशासनाने घेतला आहे. १४ फेब्रुवारी ते १७ फेब्रुवारीपर्यंत एकूण ११ गाड्या रद्द करण्यात आल्या होत्या.

 Gujjar agitation; Trains canceled by Tuesday | गुज्जर आंदोलनाचा फटका; मंगळवारपर्यंत गाड्या रद्द

गुज्जर आंदोलनाचा फटका; मंगळवारपर्यंत गाड्या रद्द

Next

मुंबई : गुज्जर आंदोलनामुळे रेल्वेच्या वेळापत्रकावर परिणाम झाला असून, १९ फेब्रुवारीपर्यंत मेल, एक्स्प्रेस रद्द करण्याचा निर्णय पश्चिम रेल्वे प्रशासनाने घेतला आहे. १४ फेब्रुवारी ते १७ फेब्रुवारीपर्यंत एकूण ११ गाड्या रद्द करण्यात आल्या होत्या. मात्र आंदोलनाची तीव्रता जास्त असल्याने १४ फेब्रुवारी रोजीच १९ गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत.
१४ फेब्रुवारीला अवध एक्स्प्रेस, डेहराडून एक्स्प्रेस, हरिद्वार एक्स्प्रेस, जनता एक्स्प्रेस, पश्चिम एक्स्प्रेस, मंदसौर-केटा-मेरठ सिटी एक्स्प्रेस, वांद्रे टर्मिनस-जयपूर सुपरफास्ट एक्स्प्रेस, गोल्डन टेम्पल मेल, स्वराज एक्स्प्रेस, सर्वाेद्य एक्स्प्रेस, मेरठ सिटी-मंदसौर एक्स्प्रेस, मेवाड एक्स्प्रेस, नवी दिल्ली-इंदौर एक्स्प्रेस, अनन्या एक्स्प्रेस या गाड्या रद्द केल्या आहेत.
१५ फेब्रुवारीला डेहराडून-वांद्रे टर्मिनस एक्स्प्रेस, गोल्डन टेम्पल मेल, स्वराज एक्स्प्रेस, सर्वाेद्य एक्स्प्रेस, जनता एक्स्प्रेस, आॅगस्ट क्रांती राजधानी एक्स्प्रेस, डेहराडून एक्स्प्रेस या गाड्या रद्द केल्या आहेत.
तर १६ फेब्रुवारीला जनता एक्स्प्रेस, पश्चिम एक्स्प्रेस, जनता एक्स्प्रेस, लखनऊ एक्स्प्रेस, गरीब रथ एक्स्प्रेस, अवध एक्स्प्रेस, डेहराडून एक्स्प्रेस, आॅगस्ट क्रांती राजधानी एक्स्प्रेस रद्द केल्या आहेत.
१७ फेब्रुवारीला अवध एक्स्प्रेस, गरीब रथ एक्सप्रेस, जनता एक्स्प्रेस, गोल्डन टेम्पल मेल या गाड्या, तर १८ फेब्रुवारीला जनता एक्स्प्रेस, पश्चिम एक्स्प्रेस, १९ फेब्रुवारीला अवध एक्स्प्रेस ही गाडी रद्द करण्यात आली आहे. मात्र आंदोलनकर्त्यांची भूमिका ज्याप्रमाणे असेल, त्याप्रमाणे जादा गाड्या रद्द होण्याची शक्यता आहे.

Web Title:  Gujjar agitation; Trains canceled by Tuesday

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :railwayरेल्वे