...तर राज्यपाल, मुख्यमंत्र्यांना घेराव!  

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 3, 2018 05:25 AM2018-02-03T05:25:06+5:302018-02-03T05:25:24+5:30

मुंबई विद्यापीठातील विविध परीक्षांचे निकाल उशिराने लागल्याने असंख्य विद्यार्थ्यांचे वर्ष वाया गेले आहे. त्यांना नुकसान भरपाई देत, माजी कुलगुरू डॉ. संजय देशमुख यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्याची मागणी करत, प्रोग्रेसिव्ह स्टुडंट मूव्हमेंट या विद्यार्थी संघटनेने आक्रमक पवित्रा घेतला आहे.

 ... the governor, the chief minister rounded! | ...तर राज्यपाल, मुख्यमंत्र्यांना घेराव!  

...तर राज्यपाल, मुख्यमंत्र्यांना घेराव!  

Next

मुंबई  - मुंबई विद्यापीठातील विविध परीक्षांचे निकाल उशिराने लागल्याने असंख्य विद्यार्थ्यांचे वर्ष वाया गेले आहे. त्यांना नुकसान भरपाई देत, माजी कुलगुरू डॉ. संजय देशमुख यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्याची मागणी करत, प्रोग्रेसिव्ह स्टुडंट मूव्हमेंट या विद्यार्थी संघटनेने आक्रमक पवित्रा घेतला आहे. नुकसान भरपाई न मिळाल्यास राज्यपालांसह मुख्यमंत्री, शिक्षणमंत्री यांना दिसेल, तिथे घेराव घालण्याचा इशारा संघटनेचे अध्यक्ष नितीन माने यांनी, शुक्रवारी घेतलेल्या पत्रकार परिषदेत दिला आहे.
माने यांनी सांगितले की, या लढ्याला नॅशनल स्टुडंट युनियन आॅफ इंडिया, राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस संघटना, प्रहार विद्यार्थी संघटना, पुरोगामी विद्यार्थी संघटना, रिपब्लिकन विद्यार्थी सेना, स्वाभिमानी विद्यार्थी संघटना, छात्रभारती विद्यार्थी संघटना, स्टुडंट लॉ काउन्सिल, स्वाभिमान विद्यार्थी संघटना या इतर विद्यार्थी संघटनांचा पाठिंबा मिळाला आहे. मागण्या मान्य होईपर्यंत लढा सुरू राहील, असेही माने यांनी सांगितले.

Web Title:  ... the governor, the chief minister rounded!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.