रिअल इस्टेट क्षेत्राला येणार अच्छे दिन!; परवडणाऱ्या घरांच्या किमती स्थिरावणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 1, 2019 02:36 AM2019-01-01T02:36:14+5:302019-01-01T02:36:47+5:30

नोटाबंदी, वस्तू व सेवा कर आणि त्यासोबत आलेल्या रेरा कायद्यानंतर बांधकाम क्षेत्राला नव्या वर्षात स्थिरता येण्याची शक्यता गृहनिर्माण तज्ज्ञ आणि विकासकांमधून व्यक्त केली जात आहे. न

 Good day will come real estate sector !; Affordable housing prices are stable | रिअल इस्टेट क्षेत्राला येणार अच्छे दिन!; परवडणाऱ्या घरांच्या किमती स्थिरावणार

रिअल इस्टेट क्षेत्राला येणार अच्छे दिन!; परवडणाऱ्या घरांच्या किमती स्थिरावणार

Next

- चेतन ननावरे

मुंबई : नोटाबंदी, वस्तू व सेवा कर आणि त्यासोबत आलेल्या रेरा कायद्यानंतर बांधकाम क्षेत्राला नव्या वर्षात स्थिरता येण्याची शक्यता गृहनिर्माण तज्ज्ञ आणि विकासकांमधून व्यक्त केली जात आहे. नव्या वर्षात परवडणाºया घरांच्या किमती स्थिरावणार असून, ग्रीन होम्स आणि स्मार्ट होम्सची मोठ्या प्रमाणात बांधणी होण्याची अपेक्षा आहे.
याबाबत गृहनिर्माण तज्ज्ञ रमेश प्रभू म्हणाले की, रेरा कायद्यामुळे ग्राहकांसह विकासकांमध्ये बरीच पारदर्शकता निर्माण झाली आहे. त्यामुळे नव्या वर्षात परवडणारी घरे मोठ्या संख्येने खरेदी होतील. अद्याप गुंतवणूकदारांनी बांधकाम क्षेत्रात म्हणावी तितकी गुंतवणूक केली नसल्याने घराच्या किमती स्थिर राहण्याची शक्यता आहे. बांधकाम व्यावसायिक रमेश संघवी म्हणाले की, मावळत्या वर्षात अनेक संकटांमुळे रिअल इस्टेट क्षेत्रात मरगळ आली होती. मात्र, बांधकाम क्षेत्रातील पारदर्शकता आणि विश्वासार्हता वाढल्याने दसºयानंतर चित्र बदलण्यास सुरुवात झाली आहे. परिणामी, नव्या वर्षात बांधकाम क्षेत्र मरगळ झटकून पुन्हा एकदा भरारी घेईल, अशी अपेक्षा आहे. विशेषत: नियमांत आलेल्या शिथिलतेमुळे मोठ्या प्रकल्पांना गती मिळेल. त्यात अधिकाधिक ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी विकासकांकडून वॉटर हार्वेस्टिंग, सोलर पॅनल यांचा समावेश प्रकल्पांत केला जाईल. त्याचा थेट फायदा ग्राहकांना होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
रेरा कायद्याने लागू केलेल्या कार्यपद्धतीमुळे बांधकाम क्षेत्रात अधिक मजबुती आल्याचा दावा बांधकाम व्यावसायिक अमित हावरे यांनी केला आहे. तसेच निश्चित कालावधीमुळे नामांकित व मोठ्या व्यावसायिकांना नव्या वर्षात त्याचा चांगला फायदा होईल. मुळात बांधकाम व्यावसायिकांवर ग्राहकांच्या वाढत्या विश्वासामुळे प्रकल्पांना ग्राहक पसंती देतील, अशी आशा आहे. त्यात स्मार्ट सिटीजच्या योजनेमुळे शहरांत स्मार्ट घरांची पर्वणी ग्राहकांना मिळेल. घरांच्या किमती कमी ठेवताना ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी आपल्या नफ्यातील वाटा खर्चून स्मार्ट सेवा देणाºया घरांची उभारणी करावी लागेल.

उत्पन्न मिळवून देणारे सेकंड होम्स!
नोटाबंदी, जीएसटी तसेच रेरा कायद्यानंतर नवे प्रकल्प सुरू करताना विकासक खबरदारी बाळगत आहेत. त्यामुळे येत्या वर्षात बांधकाम क्षेत्र सावरेल, अशी अपेक्षा बांधकाम व्यावसायिक पुनीत अग्रवाल यांनी व्यक्त केली. सर्वसामान्यांना परवडणारी आणि सेकंड होम संकल्पनेतील घरे ग्राहकांना उत्पन्न मिळवून देत आहेत. त्यामुळे नव्या वर्षात ग्राहकांसाठी अशा घरांची बांधणी मोठ्या प्रमाणात होईल, असेही ते म्हणाले.

Web Title:  Good day will come real estate sector !; Affordable housing prices are stable

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Mumbaiमुंबई