जागतिक बाजारात आता ‘मनी ट्रेड कॉइन’!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 6, 2017 02:43 AM2017-10-06T02:43:54+5:302017-10-06T02:44:34+5:30

वित्तीय गुंतवणूक, विदेश चलन विनिमय आणि डिजिटल करन्सी व्यवहार करता यावेत, म्हणून मनी ट्रेड कॉइन आता दुबईतील नोव्हा एक्सचेंज बाजाराद्वारे जागतिक बाजारपेठेत आली आहे

Global Trade Now 'Money Trade Coin'! | जागतिक बाजारात आता ‘मनी ट्रेड कॉइन’!

जागतिक बाजारात आता ‘मनी ट्रेड कॉइन’!

Next

मुंबई : वित्तीय गुंतवणूक, विदेश चलन विनिमय आणि डिजिटल करन्सी व्यवहार करता यावेत, म्हणून मनी ट्रेड कॉइन आता दुबईतील नोव्हा एक्सचेंज बाजाराद्वारे जागतिक बाजारपेठेत आली आहे. दुबईतील बुर्ज अल अरबमध्ये ४० अतिमहत्त्वाच्या व्यावसायिकांच्या उपस्थितीत मनी ट्रेड कॉइनचे संस्थापक व मुख्य कार्यकारी अधिकारी अमित लखनपाल आणि एच.ई. शेख सकीर अल नहयान यांच्या हस्ते या सेवेचा शुभारंभ करण्यात आला.
मनी ट्रेड कॉइनमुळे क्रिप्टोकरन्सीचे व्यवहार आणि ज्ञान ई-अ‍ॅकॅडमी व ई-पोर्टलच्या माध्यमातून सुलभ झाले आहेत. मनी ट्रेड कॉइनद्वारे इथरिअम, रिपल, मोरेनो बिटकॉइन यांचे व्यवहार करता येणार आहेत. लवकरच १ हजार ८८ क्रिप्टोकरन्सीअंतर्गत चलनबदल करता येईल. त्यामुळे वेळेची बचत होऊन खर्चही कमी होणार आहे. या सेवेमुळे रोख बाळगण्याची गरज भासणार नसून लवचीक आणि परिणामकारकपणे व्यवहार करणे शक्य होणार आहे.
अमित लखनपाल यांनी सांगितले की, लवकरच स्वित्झर्लंड आणि भारतातील गुंतवणूकदारांचा या कंपनीत सहभाग होईल. भारतातील चलनबदलासाठी हे व्यासपीठ असून येत्या १९ आॅक्टोबरपासून त्याची सुरुवात होईल.
मनी ट्रेड कॉइनतर्फे प्रत्यक्ष डेबिट आणि क्रेडिट कार्ड तसेच डिजिटल कार्ड लवकरच काही निवडक देशांमध्ये उपलब्ध होणार आहे. त्याचबरोबर मनी ट्रेड कॉइनमार्फत आॅनलाइन शॉपिंग, विमानाची तिकिटे काढता येणार आहेत. या व्यवहारांमधील नफ्याचा ५ टक्के वाटा यूएईमधील धर्मादाय संस्थांना आणि १५ टक्के वाटा कल्याणकारी न्यासांना दिला जाणार आहे.

Web Title: Global Trade Now 'Money Trade Coin'!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Mumbaiमुंबई