मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर आज बोगद्यादरम्यान गॅन्ट्री बसविण्याचे काम; दोन तासांचा ब्लॉक

By ऑनलाइन लोकमत | Published: January 11, 2024 06:48 AM2024-01-11T06:48:49+5:302024-01-11T06:49:18+5:30

पुण्याहून मुंबईकडे जाणारी हलकी वाहने व बस या खोपोली एक्झिट येथून वळविण्यात येणार आहेत.

Gantry installation work during tunnel today on Mumbai-Pune Expressway; A block of two hours | मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर आज बोगद्यादरम्यान गॅन्ट्री बसविण्याचे काम; दोन तासांचा ब्लॉक

मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर आज बोगद्यादरम्यान गॅन्ट्री बसविण्याचे काम; दोन तासांचा ब्लॉक

लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई: यशवंतराव चव्हाण (मुंबई- पुणे) द्रुतगती मार्गावर हायवे ट्रॅफिक मॅनेजमेंट सिस्टमअंतर्गत मुंबई वाहिनीवर पनवेल एक्झिट व खालापूर टोल प्लाझा व मडप बोगद्यादरम्यान येथे गॅन्ट्री बसविण्याचे काम महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळामार्फत ११ जानेवारी रोजी दुपारी १.३० ते ३.३० वाजेदरम्यान करण्यात येणार आहे. गॅन्ट्री बसविण्याच्या काळात हलक्या व जड अवजड वाहनांची वाहतूक पूर्णतः बंद करण्यात येणार आहे.

पुण्याहून मुंबईकडे जाणारी हलकी वाहने व बस या खोपोली एक्झिट येथून वळविण्यात येणार आहेत. राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ४८ जुना पुणे-मुंबई महामार्गावरून खोपोली शहरातून पुढे  शेडुंग टोल नाकामार्गे ही वाहने मुंबई वाहिनीवर मार्गस्थ होतील.

Web Title: Gantry installation work during tunnel today on Mumbai-Pune Expressway; A block of two hours

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.