पंधराव्या मजल्यावरून उडी घेत ‘फ्लाइट अटेंडंट’ची आत्महत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 8, 2018 12:54 AM2018-06-08T00:54:12+5:302018-06-08T00:54:12+5:30

इमारतीच्या पंधराव्या मजल्यावरून उडी मारून एका फ्लाइट अटेंडंटने आयुष्य संपविले. ही घटना गोरेगावच्या आरे परिसरात बुधवारी घडली. पोलिसांनी या प्रकरणी अपघाती मृत्यूची नोंद केली असून अधिक चौकशी सुरू आहे.

Flight attendant suicides due to jump from the 15th floor | पंधराव्या मजल्यावरून उडी घेत ‘फ्लाइट अटेंडंट’ची आत्महत्या

पंधराव्या मजल्यावरून उडी घेत ‘फ्लाइट अटेंडंट’ची आत्महत्या

Next

मुंबई : इमारतीच्या पंधराव्या मजल्यावरून उडी मारून एका फ्लाइट अटेंडंटने आयुष्य संपविले. ही घटना गोरेगावच्या आरे परिसरात बुधवारी घडली. पोलिसांनी या प्रकरणी अपघाती मृत्यूची नोंद केली असून अधिक चौकशी सुरू आहे.
चंद्रकांत परमार (२७) असे मृत तरुणाचे नाव आहे. तो एका खासगी एअरलाइन्समध्ये ‘फ्लाइट अटेंडंट’ म्हणून काम करत होता. बुधवारी तो रॉयल पाममधील समीट अपार्टमेंटच्या पंधराव्या मजल्यावर गेला. त्या ठिकाणी त्याने सोबत आणलेल्या बॉटलमधून काही तरी पिऊन नंतर वरून उडी मारली. त्याला जखमी अवस्थेत स्थानिक रुग्णालयात दाखल करण्यात आले. तेथे डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. आरे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, परमार हा पूर्वी याच इमारतीत भाडे तत्त्वावर राहत होता. मात्र, सध्या पिकार्डली वन या इमारतीत त्याच्या एका मैत्रिणीसोबत राहत होता, ती केबिन क्रू मेंबर म्हणून काम करते. सीसीटीव्ही फुटेजनुसार परमारने उडी मारण्यापूर्वी दारू प्यायली असावी. समीट इमारतीत पूर्वी राहत असल्याने त्याला वर जाताना कोणीच अडविले नसावे, असा अंदाज वर्तवण्यात येत आहे. मात्र, त्याच्या घरी पोलिसांना सुसाइड नोट सापडली आहे. त्यात मृत्यूसाठी कोणीही जबाबदार नसल्याचे नमूद आहे.

Web Title: Flight attendant suicides due to jump from the 15th floor

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.