Mumbai Fire: दक्षिण मुंबईत गोदामाला भीषण आग, धुराचे प्रचंड लोट; अग्निशमन दल पोहोचले

By ऑनलाइन लोकमत | Published: April 18, 2024 11:08 AM2024-04-18T11:08:21+5:302024-04-18T11:09:08+5:30

Mumbai Fire at Reay Road: दक्षिण मुंबईतील रे रोड येथील एका गोदामात भीषण आग लागल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.

fire broke out in a godown in the Reay Road area of Mumbai | Mumbai Fire: दक्षिण मुंबईत गोदामाला भीषण आग, धुराचे प्रचंड लोट; अग्निशमन दल पोहोचले

Mumbai Fire: दक्षिण मुंबईत गोदामाला भीषण आग, धुराचे प्रचंड लोट; अग्निशमन दल पोहोचले

Mumbai Fire at Reay Road: दक्षिण मुंबईतील रे रोड येथील एका गोदामात भीषण आग लागल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. आगीचं कारण अद्याप कळू शकलेलं नाही. पण घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या ५ गाड्या घटनास्थळी पोहोचल्या आहेत. 

अग्निशमन दलाकडून आग विझवण्याचे प्रयत्न सुरू आहेत. रे रोड येथे कंपन्यांची गोदामं आहेत. ब्रिटानिया कंपनीच्या बाजूलाच असलेल्या गोदामाला आग लागल्याची माहिती समोर आली आहे. धुराचे लोट अगदी पूर्व द्रूतगती महामार्गावरुनही पाहायला मिळत आहेत. आगीत कोणत्याचीही जीवितहानीची माहिती अद्याप समोर आलेली नाही.

सविस्तर वृत्त लवकरच...

Web Title: fire broke out in a godown in the Reay Road area of Mumbai

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.