दक्षिण मुंबईतील मॉलमधील दोन दुकानांवर अग्निशमन दलाचा छापा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 23, 2019 02:26 AM2019-01-23T02:26:39+5:302019-01-23T02:26:42+5:30

अग्निशमन दलाने दक्षिण मुंबईतील मॉलमध्ये केलेल्या पाहणीत दोन दुकानांवर आज छापे मारण्यात आले.

Fire brigade raid in two shops in South Mumbai mall | दक्षिण मुंबईतील मॉलमधील दोन दुकानांवर अग्निशमन दलाचा छापा

दक्षिण मुंबईतील मॉलमधील दोन दुकानांवर अग्निशमन दलाचा छापा

Next

मुंबई : अग्निशमन दलाने दक्षिण मुंबईतील मॉलमध्ये केलेल्या पाहणीत दोन दुकानांवर आज छापे मारण्यात आले. यामध्ये गॅस सिलिंडरचा बेकायदा वापर आढळून आला. गॅस सिलिंडरचा साठा महापालिकेने जप्त केला आहे. एकूण १५ गॅस सिलिंडर जप्त करण्यात आले आहेत.
मुंबईत आगीच्या घटना वाढत असल्याने अग्निशमन दलामार्फत उपहारगृह, मॉल, आस्थापना, इमारतींची नियमित तपासणी सुरू केली आहे. या तपासणीत त्या ठिकाणी अग्निशमन नियमांचे उल्लंघन होत असल्याचे आढळून आल्यास तत्काळ कारवाई केली जात आहे. या मोहिमेंतर्गत अग्निशमन दलाने आज नरिमन पॉइंट येथील सीआर २ मॉलमध्ये अचानक भेट दिली.
या मॉलमध्ये असलेल्या मॅकडोनाल्डमध्ये नऊ तर फूड कोर्टमध्ये पाच गॅस सिलिंडर आढळून आले. मोठ्या प्रमाणात गॅस सिलिंडरचा साठा ठेवणे बेकायदेशीर असल्याने, अग्निशमन दलाने हा साठा जप्त केला असल्याची माहिती दलाचे प्रमुख अधिकारी प्रभात रहांदळे यांनी दिली.
तत्काळ कारवाई
मुंबईत आगीच्या घटना वाढत असल्याने अग्निशमन दलामार्फत उपहारगृह, मॉल, आस्थापना, इमारतींची नियमित तपासणी सुरू केली आहे. या तपासणीत त्या ठिकाणी अग्निशमन नियमांचे उल्लंघन होत असल्याचे आढळून आल्यास तत्काळ कारवाई केली जाते़

Web Title: Fire brigade raid in two shops in South Mumbai mall

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.