Video : अंधेरीतील कामगार रुग्णालयाला आग; 6 रुग्णांचा मृत्यू तर 160 जखमी 

By ऑनलाइन लोकमत | Published: December 17, 2018 04:51 PM2018-12-17T16:51:27+5:302018-12-17T16:51:46+5:30

रुग्णालयाच्या इमारतीच्या शेवटच्या मजल्यावर ही आग लागली असून घटनास्थळी अग्निशमन दलाच्या आठ गाड्या आग विझविण्यासाठी दाखल झाल्या आहेत. या आगीत काही जण अडकले असल्याची भीती वर्तविली जात आहे. 

Fire in Andheri Kamgar Hospital; Some are afraid of stuck | Video : अंधेरीतील कामगार रुग्णालयाला आग; 6 रुग्णांचा मृत्यू तर 160 जखमी 

Video : अंधेरीतील कामगार रुग्णालयाला आग; 6 रुग्णांचा मृत्यू तर 160 जखमी 

Next
ठळक मुद्देआज दुपारी ४ वाजताच्या सुमारास आग लागली आहेसायंकाळी ६ वाजताच्या सुमारास आग आटोक्यात आली नेमकी आग कशामुळे लागली हे कळालेले नाही. 

मुंबई - अंधेरीतील ईएसआयसी म्हणजेच कामगार रुग्णालयाला आज दुपारी ४ वाजताच्या सुमारास आग लागली आहे. रुग्णालयाच्या इमारतीच्या शेवटच्या मजल्यावर ही आग लागली असून घटनास्थळी अग्निशमन दलाच्या आठ गाड्या आग विझविण्यासाठी दाखल झाल्या आहेत. या आगीत काही जण अडकले असल्याची भीती वर्तविली जात आहे. रुग्णालयात अडकलेल्या रुग्णांना शिडीने खाली उतरविण्याचे बचावकार्य अग्निशमन दलाचे जवान करत आहेत. तसेच टेरेसवरून देखील दोरखंडाच्या सहाय्याने आगीत अडकलेल्यांना इमारतीबाहेर काढण्याचे प्रयत्न सुरु आहेत. मात्र, या बचाव कार्यादरम्यान 2 रुग्णांचा आणि उपचारादरम्यान रुग्णालयात 4 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तर अग्निशमन दलाचे 3 जवान आणि 157 रुग्ण जखमी झाल्याची माहिती मिळत आहे. 

आज दुपारी ४ वाजताच्या सुमारास अंधेरीतील एमआयडीसी मरोळ परिसरातील कामगार रुग्णालयाला आग लागली. त्यानंतर ४.२० वाजताच्या सुमारास अग्निशमन दलाला कळविण्यात आले. रुग्णालयाच्या चौथ्या मजल्यावर आग लागली असून माहिती मिळताच अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी पोहचले आणि आग विझविण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरु आहे. आगीमुळे रुग्णालयातच्या चौथ्या मजल्यावर धुराचे लोट पसरले आहेत. रुग्णालयात अडकलेल्या रुग्णांना आगीच्या धुराचा त्रास होत असल्याने अग्निशमन दलाच्या जवानांनी शिडीच्या सहाय्याने इमारतीबाहेर काढले आहे. १० रुग्णांना कूपर रुग्णालय, ३ रुग्णांना ट्रॉमा आणि १५ रुग्णांना सेव्हन हिल रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. रुग्णालयाबाहेर बघ्यांनी गर्दी केल्याने मदतकार्यात आणि आग विझविण्याचा कार्यात व्यत्यय येत होता. सायंकाळी ६ वाजताच्या सुमारास आग आटोक्यात आली.  मात्र, नेमकी आग कशामुळे लागली हे कळालेले नाही. 






 

Web Title: Fire in Andheri Kamgar Hospital; Some are afraid of stuck

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.