अखेर सुरक्षाप्रमुखासह सहा पोलिसांचे निलंबन, पोलीस आयुक्तांची कारवाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 13, 2017 02:27 AM2017-12-13T02:27:49+5:302017-12-13T02:28:00+5:30

वरळीतील पोलीस मुख्यालयातून (एलए-३) जिवंत काडतुसे चोरीप्रकरणी सुरक्षाप्रमुखा (गार्ड इन्चार्ज)सह सहा पोलिसांना निलंबित करण्यात आले आहे. यामध्ये काडतुसे चोरणा-या पोलिसांचाही समावेश असून सर्वांची विभागीय चौकशी करण्यात येईल.

Finally, the suspension of six policemen with the security chief, the action of the Police Commissioner | अखेर सुरक्षाप्रमुखासह सहा पोलिसांचे निलंबन, पोलीस आयुक्तांची कारवाई

अखेर सुरक्षाप्रमुखासह सहा पोलिसांचे निलंबन, पोलीस आयुक्तांची कारवाई

Next

- जमीर काझी

मुंबई : वरळीतील पोलीस मुख्यालयातून (एलए-३) जिवंत काडतुसे चोरीप्रकरणी सुरक्षाप्रमुखा (गार्ड इन्चार्ज)सह सहा पोलिसांना निलंबित करण्यात आले आहे. यामध्ये काडतुसे चोरणा-या पोलिसांचाही समावेश असून सर्वांची विभागीय चौकशी करण्यात येईल. शनिवारी रात्री घडलेले प्रकरण अधिका-यांकडून दडपण्याचा प्रयत्न सुरू होता. मात्र, ‘लोकमत’ने हे प्रकरण समोर आणले. त्यानंतर पोलीसआयुक्त दत्ता पडसलगीकर यांनी मंगळवारी यासंदर्भातील आदेश बजाविले.
हवालदार विजय हेर्लेकर, कॉन्स्टेबल संकेत माळी, महेश दुधवडे, राजीव पवार, राहुल कदम व महेंद्र पाटील अशी त्यांची नावे आहेत. हेर्लेकर हे ‘एलए’तील गार्ड इन्चार्ज आहेत. कुर्ला पोलीस ठाण्यात नियुक्त पाटील याने वरळीतील सशस्त्र विभागातून काडतुसे व चार्जर क्लिप लंपास केल्या. या सर्वांवर प्रशासकीय कारवाई करण्यात येत आहे.
चार सशस्त्र विभागांपैकी एक असलेल्या वरळी मुख्यालयातील स्टोअर रूमजवळ शनिवारी रात्री ११च्या सुमारास पाटील गेला. तेथे रात्रीच्या ड्युटीवरील हवालदार हेर्लेकर यांच्यासह पाचही गार्ड झोपले होते. त्याने कॉन्स्टेबल माळी याच्या कमरेला बांधायचा ५० जिवंत काडतुसांचा पट्टा काढून घेतला. तसेच दोन रिकामे चार्ज क्लिप घेऊन पळ काढला. कॉन्स्टेबल माळीला जाग आल्यावर हा प्रकार उघडकीस आला. त्याने याबाबत वरिष्ठांना माहिती दिली.
सहआयुक्त (कायदा व सुव्यवस्था) देवन भारती, ‘एलए’च्या प्रमुख अस्वती दोरजे यांनी वरळी मुुख्यालयाला भेट देऊन पाहणी केली. चोरीला गेलेल्या काडतुसांचा शोध सुरू असल्याचे समजल्यानंतर कॉन्स्टेबल पाटील याने ती रात्री २च्या सुमारास दादर पोलीस ठाण्यात नेऊन जमा केली. चोरीला गेलेल्या वस्तू मिळाल्याने या प्रकाराची वाच्यता होऊन बदनामी होऊ नये, यासाठी वरिष्ठ अधिकाºयांकडून प्रकरण दडपण्याचे प्रयत्न सुरू होते. मात्र ‘लोकमत’च्या प्रतिनिधीला त्याबाबत माहिती मिळाल्यानंतर त्याबाबतचे वृत्त सोमवारी प्रकाशित केले. त्यानंतर खडबडून जागे झालेल्या प्रशासनाने संबंधित पोलिसांची प्राथमिक चौकशी सुरू केली. मात्र, त्याबाबत अप्पर आयुक्त अस्वती दोरजे, वरळी मुख्यालयाच्या उपायुक्त सुनिता सांळुके-ठाकरे यांच्याकडून माहिती दडपण्याचा प्रयत्न करण्यात येत होता.
‘लोकमत’ने त्याबाबतचेही वृत्त मंगळवारी दिल्यानंतर आयुक्त दत्ता पडसलगीकर यांनी सर्व संबंधितांची प्राथमिक चौकशी करून अहवाल सादर करण्याची सूचना दिली. त्यानंतर सहाही जणांना निलंबित करून त्यांच्या विभागीय चौकशीचे आदेश अधिकाºयांना दिले.

चौकशीनंतर कारवाई
ही घटना अत्यंत गंभीर असून त्याबाबत दक्षता बाळगण्याची सूचना अधिकाºयांना केली आहे. त्याचप्रमाणे यामध्ये दोषी आढळलेल्या सहा जणांना निलंबित केले आहे. विभागीय चौकशीनंतर पुढील कारवाई केली जाईल. कॉन्स्टेबलने काडतुसे पळविण्यामागील नेमके कारण स्पष्ट झाल्यानंतर आवश्यकतेनुसार त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला जाईल. अधिकाºयांना आवश्यक माहिती देण्याची सूचना करण्यात आली आहे. - दत्ता पडसलगीकर, पोलीस आयुक्त

Web Title: Finally, the suspension of six policemen with the security chief, the action of the Police Commissioner

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.