अखेर एमएससीच्या परीक्षा पुढे ढकलल्या!, विद्यापीठावर नामुष्की

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 8, 2017 04:35 AM2017-12-08T04:35:54+5:302017-12-08T10:10:41+5:30

एमएससीच्या प्रथम वर्षाचा अभ्यासक्रम पूर्ण शिकवून झालेला नसतानाही परीक्षा जाहीर करण्याची घाई विद्यापीठ प्रशासनाने केली होती.

Finally postponed the MSc Examination !, University of Missouri | अखेर एमएससीच्या परीक्षा पुढे ढकलल्या!, विद्यापीठावर नामुष्की

अखेर एमएससीच्या परीक्षा पुढे ढकलल्या!, विद्यापीठावर नामुष्की

googlenewsNext

मुंबई : एमएससीच्या प्रथम वर्षाचा अभ्यासक्रम पूर्ण शिकवून झालेला नसतानाही परीक्षा जाहीर करण्याची घाई विद्यापीठ प्रशासनाने केली होती. मात्र, वेळापत्रक अंगलट येत असल्याचे लक्षात येताच अखेर परीक्षांच्या वेळापत्रकात बदल करत मुंबई विद्यापीठाच्या परीक्षा विभागाने परीक्षा पुुढे ढकलण्यात आल्याची घोषणा केली आहे.
विद्यार्थी संघटनांनी घेतलेला आक्रमक पवित्रा पाहून प्रशासनाने गुरूवारी याप्रकरणी तातडीची बैठक बोलावली होती. यात डिसेंबरमध्ये होणारी परीक्षा जानेवारीपर्यंत ढकलण्याचा निर्णय घेण्यात आला. मुळात बीएसस्सीच्या निकालास उशीर झाल्याने यंदा एमएससीचे प्रवेश उशीरा झाले होते. त्यामुळे ९० दिवसांची शिकवणीची अट पूर्ण झाली नसतानाही प्रशासनाने प्रथम वर्षाच्या परीक्षांची घोषणा केली होती. आधी अभ्यासक्रम पूर्ण करा, मग परीक्षा घ्या, अशी मागणी विद्यार्थी संघटनांनी केली होती. अखेर प्रशासनाने नमते घेत २७ डिसेंबर रोजी होणारी परीक्षा २३ जानेवारीला घेण्याचा निर्णय जाहीर केला आहे.

Web Title: Finally postponed the MSc Examination !, University of Missouri

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.