आजच पाणी भरून ठेवा, उद्यापासून कमी येणार!

By ऑनलाइन लोकमत | Published: November 5, 2023 07:55 AM2023-11-05T07:55:22+5:302023-11-05T07:55:28+5:30

पालिकेने पवई निम्नस्तरीय जलाशयाच्या कप्पा क्रमांक १ व २ च्या दुरुस्तीचे काम हाती घेतले आहे.

Fill up the water today, it will decrease from tomorrow! | आजच पाणी भरून ठेवा, उद्यापासून कमी येणार!

आजच पाणी भरून ठेवा, उद्यापासून कमी येणार!

मुंबई : पालिकेने पवई निम्नस्तरीय जलाशयाच्या कप्पा क्रमांक १ व २ च्या दुरुस्तीचे काम हाती घेतले आहे. या दुरुस्तीसाठी पावसाळा वगळता १३ महिन्यांचा कालावधी लागणार आहे. कप्पा क्रमांक १ ची दुरुस्ती ही सोमवारी ६ नोव्हेंबरपासून सुरु करण्यात येणार आहे. त्यामुळे एकाच कप्प्यातून पाणीपुरवठा केला जाणार आहे. त्यामुळे कुर्ला पश्चिम परिसरातील काही भागांमध्ये कमी दाबाने पाणीपुरवठा होणार आहे. त्यामुळे नागरिकांनी काटकसरीने पाणी वापर करुन सहकार्य करावे, असे आवाहन पालिका प्रशासनाने केले आहे. कमी दाबाने पाणीपुरवठा होणार आहे.

   अंधेरी पूर्व :  बामणदया पाडा, मारवा इस्टेट, अशोक टॉवर, उदय नगर, साकीनाका (पाणीपुरवठा वेळ- सकाळी ६ ते दुपारी २ वाजेपर्यंत)
   घाटकोपर अंधेरी लिंक रोड :  टिळक नगर, बामणदया पाडा, मारवा इस्टेट, अशोक टॉवर, उदय नगर, साकीनाका (पाणीपुरवठा वेळ- सकाळी ६ ते दुपारी २ वाजेपर्यंत)
   कुर्ला-अंधेरी रस्ता :  जरी मरी, विजय नगर, एल.बी.एस. नगर, शास्त्री नगर, शेट्टीया नगर, सत्य नगर जलवाहिनी, वायर गल्ली, ३ नंबर खाडी (पाणीपुरवठा वेळ- सकाळी ६ ते दुपारी २ वाजेपर्यंत)

Web Title: Fill up the water today, it will decrease from tomorrow!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Waterपाणी