संविधान जाळणाऱ्यांविरोधात देशद्रोहाचा गुन्हा दाखल करा!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 12, 2018 03:25 AM2018-08-12T03:25:58+5:302018-08-12T03:26:53+5:30

दिल्लीतील जंतरमंतर मैदानावर संविधानाची प्रत जाळणाºयांविरोधात देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी जोर धरू लागली आहे.

File a sedition case against who fire Constitution! | संविधान जाळणाऱ्यांविरोधात देशद्रोहाचा गुन्हा दाखल करा!

संविधान जाळणाऱ्यांविरोधात देशद्रोहाचा गुन्हा दाखल करा!

Next

मुंबई : दिल्लीतील जंतरमंतर मैदानावर संविधानाची प्रत जाळणाºयांविरोधात देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी जोर धरू लागली आहे. काँग्रेससह भीम आर्मी आणि विविध समविचारी संघटनांनी मुंबईतील विविध पोलीस ठाण्यांत शनिवारी तक्रारी दाखल केल्या आहेत. तसेच दोषींविरोधात देशद्रोहाचा गुन्हा दाखल न केल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा दिला आहे.
दिल्ली येथील जातिगत आरक्षणविरोधी मंच या संघटनेचे प्रमुख श्रीनिवास पांडेय व त्याच्या कार्यकर्त्यांनी ९ आॅगस्ट रोजी जंतरमंतर या ठिकाणी पोलीस यंत्रणेसमक्ष संविधानाची जाहीररीत्या होळी करीत डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या निषेधाच्या घोषणा दिल्या. तसेच या प्रकाराचे चित्रीकरण करून ते सोशल मीडियावर पोस्ट केले. या घटनेचे तीव्र पडसाद शनिवारी मुंबईत उमटले. मुंबई काँग्रेस अनुसूचित जाती विभागातर्फे सायन कोळीवाडा पोलीस ठाण्यासह निर्मलनगर, डोंगरी, दिंडोशी अशा एकूण २० पोलीस ठाण्यांत या प्रकरणी तक्रार नोंदवण्यात आल्याची माहिती मुंबई काँग्रेस अनुसूचित जाती विभागाचे अध्यक्ष कचरू यादव यांनी दिली. यादव म्हणाले की, या प्रकरणी पोलिसांनी अ‍ॅट्रॉसिटीअंतर्गत कारवाई केली नाही, तर दादर रेल्वे स्थानकाबाहेर सोमवारी सकाळी ११ वाजता तीव्र निदर्शने करण्यात येतील.
तर भीम आर्मीनेही सरकारला १५ आॅगस्टपर्यंत देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे. अन्यथा राज्यातील एकाही मंत्री आणि लोकप्रतिनिधींना झेंडावंदन करू देणार नाही, असा इशारा भीम आर्मीचे अशोक कांबळे यांनी दिला आहे.

सोशल मीडियावर पडसाद

संविधानाची प्रत जाळल्याचे तीव्र पडसाद सोशल मीडियावर दिसून आले. बहुतेक युजर्सनी डीपीमधून ‘जाहीर निषेध, संविधान जाळणाºयांचा’ अशा आशयाचे फोटो ठेवत या प्रकाराचा निषेध नोंदवला. ‘संविधानाची प्रत जाळणारे हे देशद्रोही असल्याने त्यांनी देश सोडून जावा’ असा मेसेज सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहे. त्यामुळे या घटनेबद्दल संतापाची लाट उसळली आहे.

Web Title: File a sedition case against who fire Constitution!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.