राज्यात ‘कर्करोग वॉरिअर्स’चा लढा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 5, 2018 04:05 AM2018-02-05T04:05:58+5:302018-02-05T04:06:10+5:30

‘कॅन्सर वॉरिअर्स’च्या माध्यमातून राज्यभरात कर्करोगाबद्दल जागरूकता व त्याचे निदान करण्याचा प्रयत्न सुरू आहे.

The fight of Cancer Warriors in the state | राज्यात ‘कर्करोग वॉरिअर्स’चा लढा

राज्यात ‘कर्करोग वॉरिअर्स’चा लढा

Next

मुंबई : ‘कॅन्सर वॉरिअर्स’च्या माध्यमातून राज्यभरात कर्करोगाबद्दल जागरूकता व त्याचे निदान करण्याचा प्रयत्न सुरू आहे. टाटा रुग्णालयामधून कर्करोगाचे प्रशिक्षण घेतलेले डॉक्टर जे सद्य:स्थितीत राज्यात वैद्यकीय व्यवसाय करीत आहेत, अशा तज्ज्ञांनी ऐच्छिकरीत्या ‘महाराष्ट्र कॅन्सर वॉरिअर संघटने’ची स्थापना केली आहे. अशा ५७ कर्करोगतज्ज्ञ डॉक्टरांचा समूह राज्यभरात गावपातळीवर काम करीत आहे.
महाराष्ट्र कॅन्सर वॉरिअर्सच्या डॉक्टरांनी जिल्हास्तरावर रुग्णांसाठी मोफत कर्करोग बाह्यरुग्ण विभाग, किमोथेरपी आणि शस्त्रक्रिया करण्यात पुढाकार घेतला आहे. शालेय विद्यार्थ्यांमध्ये तंबाखू सेवानाच्या दुष्परिणामांबाबत जागरूकता निर्माण केली जात आहे.
जागतिक कर्करोग दिनानिमित्त राज्यात ‘कर्करोग जागृती पंधरवडा’ साजरा करण्यात येणार आहे. या काळात कर्करोग तपासणी शिबिरांचे आयोजन करण्यात येणार आहे. मालाड येथील मालवणी सामान्य रुग्णालयात कर्करोग पूर्वनिदान तपासणी केंद्र सुरू करण्यात आले आहे. टाटा मेमोरिअलच्या कॅन्सर वॉरिअर्स डॉक्टरांतर्फे आठवड्यातून दोन वेळा कर्करोग बाह्यरुग्ण तपासणी करण्यात येणार आहे.
प्राथमिक अवस्थेत मौखिक कर्करोगाचे निदान कर्करोगपूर्व लक्षणांमध्ये झाले तर कर्करोगाचा बरा होण्याचा दर ७0 ते ७५ टक्के आहे. हे लक्षात घेऊन डिसेंबर २०१७मध्ये संपूर्ण महिनाभर मौखिक आरोग्य तपासणी मोहीम राज्यातील ३४ जिल्ह्यांमध्ये राबविली.
मोहिमेचा दुसरा टप्पा जानेवारी २०१८पासून सुरू झाला आहे. यात पहिल्या टप्प्यातील संशयित रुग्णांची फेरतपासणी करून त्यांच्या पूर्व कर्करोग व्रणांच्या ठिकाणांची बायोप्सी करण्यात येईल. तिसºया टप्प्यामध्ये कर्करोगाचे निश्चित निदान केलेल्या रुग्णांना उपचार देण्यात येण्यात येणार आहे.
>कर्करोग जागृती पंधरवडा - आरोग्यमंत्री
जागतिक कर्करोग दिनाच्या निमित्ताने रविवारपासून राज्यात कर्करोग जागृती पंधरवडा साजरा केला जाणार आहे. हा नवीन उपक्रम आरोग्य विभागामार्फत राबविण्यात येणार आहे. तंबाखूजन्य पदार्थ सेवनाच्या दुष्परिणामांबाबत विविध विभागांच्या अधिकाºयांची जिल्हाधिकाºयांच्या अध्यक्षतेखाली प्रत्येक जिल्ह्यात बैठक घेण्याच्या सूचना दिल्या आहेत, असे आरोग्यमंत्री डॉ. दीपक सावंत यांनी सांगितले.

Web Title: The fight of Cancer Warriors in the state

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.