सायंकाळी येथून ये-जा करताना वाटते भीती; मुलुंडमधील प्रकार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 14, 2019 03:49 AM2019-02-14T03:49:38+5:302019-02-14T03:50:05+5:30

‘आज सोमवार है क्या..अरे पॅण्ट कमरसे निकलेगी’, आज मेकअप ज्यादा लगा है..अशा अश्लील शेरेबाजीसह शाळकरी, कॉलेज विद्यार्थीनी, तरुणींसह विवाहित महिलांना कपडे, तसेच त्यांच्या अंगकाठीवरुन छेड़छाडीच्या प्रकारांनी डोके वर काढले.

 Feelings of mind going on from here to the evening; Type in Mulund | सायंकाळी येथून ये-जा करताना वाटते भीती; मुलुंडमधील प्रकार

सायंकाळी येथून ये-जा करताना वाटते भीती; मुलुंडमधील प्रकार

Next

मुंबई : ‘आज सोमवार है क्या..अरे पॅण्ट कमरसे निकलेगी’, आज मेकअप ज्यादा लगा है..अशा अश्लील शेरेबाजीसह शाळकरी, कॉलेज विद्यार्थीनी, तरुणींसह विवाहित महिलांना कपडे, तसेच त्यांच्या अंगकाठीवरुन छेड़छाडीच्या प्रकारांनी डोके वर काढले. सिरियल मोलेस्टरची धास्ती घेतली असताना, म्हाडाच्या परमपूज्य राऊळनाथ महामार्गावरील म्हाडाच्या मैदानांत सायंकाळनंतर जमणाऱ्या टवाळखोरांकडून हा प्रकार होत आहे. त्यांच्या भितीने सायंकाळी ७ नंतर घराबाहेर पडण्यास महिला घाबरत आहेत.
हे मैदान नाक्यालगतच आहे. पुढे काही अंतरावरच रिक्षा स्टॅण्ड आहे. येथील रस्त्याचा वापर अडिशेहून अधिक कुटुंबे करतात. सुरुवातीला गेट नसल्याने मैदानात वाहनाच्या रांगा लागायच्या. याच वाहनांच्या आडोशाला बसून रोडरोमियो तसेच टवाळखोरांच्या दारु पाटर्या रंगतात. पुढे म्हाडा नवरात्रोस्तव मंडळाने त्यांच्या खर्चातून लोखंडी गेट उभा केला. मात्र तोही रातोरात कोणीतरी पळवला. नंतर म्हाडाकडे पाठपुरावा करुन त्यांनी नुकताच गेट लावून घेतला आहे.
आता टवाळखोरांची हिम्मत वाढली. साडे सात नंतर रात्री उशिरापर्यंत त्यांची दारु पार्टी रंगते. ही टोळकी रस्त्याने जाणाºया महिलांना पाहून अश्लील टिका टिपण्णी करतात.
सफेद रंग म्हणजे त्यांचा सोमवार.. आज सफेद रंग है.. तु लेके जा.. असे मला बोलले. भितीने मी रस्ता बदलल्याचे स्थानिक कॉलेज तरुणीने लोकमतशी बोलताना सांगितले.
तर या टवाळखोरांच्या भितीने लांबून येणे बरे वाटते असे, तेथील विवाहित महिलेने नमूद केले. तर सायंकाळी शिकवणी वरुन घरी येणाºया मुली पालकांना सिग्नलकडे येण्यास सांगतात. तेथून त्यांचे वडिल त्यांना घरी घेऊन येतात.
याबाबत पोलिसांकडे वेळोवेळी पत्रव्यवहार केला. त्यांना पाहून टवाळखोर पळून जातात. किंवा पोलीस येणार हे त्यांना आधीच कसे समजते? हे आमच्यासाठी गूढ आहे. मुंबईतील महिला सुरक्षित असल्याचे दाखले दिले जातात, मात्र अशाप्रकारे शेरेबाजी होत असेल तर मुंबईदेखील महिलांसाठी असुक्षित म्हणावे लागेल़

ना म्हाडा लक्ष देत ना आम्हाला देऊ देत... म्हाडाकडून मैदानाकडे दुर्लक्ष होत आहे. त्यामुळे आम्ही केअरटेकर म्हणून जबाबदारी देण्याची विनंती केली. मात्र, तसेही करण्यास म्हाडा पुढाकार घेत नाही. एखाद्या मोठ्या अनुचित घटनेची प्रशासन वाट पाहत असल्याचे वाटते. गेल्या वर्षभरापासून पोलिसांकडे गस्त वाढविण्याची विनंती करत आहोत. मात्र, तेथूनही प्रतिसाद मिळत नाही आहे.
- रवी नाईक, अध्यक्ष, मुलुंड, म्हाडा कॉलनी असोसिएशन

स्थानिक रहिवाशांच्या तक्रारी आल्या. त्यानंतर, वेळोवेळी परिसरात गस्त सुरू आहे. मी स्वत: अनेकदा त्या विभागात जातो. आमच्या वेळेस ती मंडळी दिसून येत नाही. जर हा प्रकार जास्त होत असेल, तर नक्कीच त्यावर कारवाई होणार आहे.
- पुष्कराज सूर्यवंशी, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, नवघर पोलीस ठाणे, मुलुंड

Web Title:  Feelings of mind going on from here to the evening; Type in Mulund

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.