एफडीएने दिले अन्न सुरक्षेचे धडे; १५ हजार १९९ हॉटेल-रेस्टॉरंट, खाद्यविक्रेते कर्मचा-यांनाही प्रशिक्षण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 17, 2017 01:47 AM2017-12-17T01:47:10+5:302017-12-17T01:47:20+5:30

राज्याच्या अन्न व औषध प्रशासन विभागाने अन्न सुरक्षेच्या दृष्टीने पाऊल उचलत राज्यभरातील तब्बल १५ हजार १९९ हॉटेल, रेस्टॉरंट आणि खाद्यविक्रेत्यांना प्रशिक्षण दिले आहे.

FDA provides food security lessons; Training for 15 thousand 99 hotel-restaurant, food-shop workers | एफडीएने दिले अन्न सुरक्षेचे धडे; १५ हजार १९९ हॉटेल-रेस्टॉरंट, खाद्यविक्रेते कर्मचा-यांनाही प्रशिक्षण

एफडीएने दिले अन्न सुरक्षेचे धडे; १५ हजार १९९ हॉटेल-रेस्टॉरंट, खाद्यविक्रेते कर्मचा-यांनाही प्रशिक्षण

Next

मुंबई : राज्याच्या अन्न व औषध प्रशासन विभागाने अन्न सुरक्षेच्या दृष्टीने पाऊल उचलत राज्यभरातील तब्बल १५ हजार १९९ हॉटेल, रेस्टॉरंट आणि खाद्यविक्रेत्यांना प्रशिक्षण दिले आहे. यात मुंबईतील ३ हजार ८३ कर्मचा-यांचा समावेश असून, प्रशिक्षणाच्या माध्यमातून एफडीएने त्यांना अन्न सुरक्षेचे धडे दिले आहेत. शहरातील प्रत्येक गल्लीतील वडापाव, पाणीपुरी ते चायनीजच्या हातगाडीपर्यंत आणि छोट्या हॉटेलपासून पंचतारांकित हॉटेलमधील वेटर, आचा-यांपर्यंत लाखभर विक्रेत्यांना अन्न सुरक्षेचे धडे देण्यात येणार आहेत. सामान्य नागरिकांना भेसळमुक्त खाद्यान्न देण्यासाठी अन्न व औषध प्रशासनाने कंबर कसली आहे.
जागतिक आरोग्य संघटनेच्या वतीने, ‘अन्न सुरक्षा’ या संकल्पनेवर जनजागृती मोहीम राबविण्यावर भर देण्यात येत आहे. त्यासंदर्भात एफडीए विभागाकडूनही अशाच संकल्पनेवर आधारित मोहीम सुरू आहे. वडापाव, पाणीपुरी, अंडा बुर्जीपाव, चायनीज यांसारख्या हातगाडीवर विकल्या जाणाºया अनेक खाद्यपदार्थांसंदर्भात विक्रेत्यांना अन्न सुरक्षेचे पहिल्या टप्प्यात धडे दिले आहेत, अशी माहिती ‘एफडीए’च्या अन्न विभागाचे सहआयुक्त चंद्रकांत साळुंखे यांनी दिली. हॉटेल्स, रेस्टॉरंटमध्ये अथवा हातगाडीवर पदार्थ तयार करताना, कर्मचारी-विक्रेत्यांनी अ‍ॅप्रन वापरणे, हँड ग्लोव्हज वापरणे, हेडकॅप वापरणे याचे प्रशिक्षण देण्यात येणार आहे. त्याशिवाय खाद्यपदार्थांचे कच्चे साहित्य खरेदीपासून ते तयार करणे आणि ग्राहकांसमोर देण्यापर्यंत कशी व कोणती काळजी घ्यावी, याचेही प्रशिक्षण दिले आहे, असेही साळुंखे यांनी सांगितले. अन्न सुरक्षा कायद्यान्वये प्रत्येक नागरिकाला सुरक्षित, भेसळमुक्त खाद्यान्न मिळावे, हा त्यांचा हक्क आहे. त्यासाठी एफडीएने शहरात हातगाडीवरील खाद्यपदार्थ विक्रेत्यांसह मोठ्या पंचतारांकित हॉटेलमधील कर्मचाºयांपर्यंत अन्न सुरक्षेचा (सेफ्टी फूड) मंत्र देण्याचा निर्णय घेतला आहे. राज्यातील हॉटेल-रेस्टॉरंटचे कर्मचारी आणि खाद्यविक्रेत्यांना सुरक्षित अन्नाविषयी तज्ज्ञांकडून प्रशिक्षण दिल गेले. याशिवाय, अन्न सुरक्षेबाबत जनजागृती करण्यात आली. संपूर्ण देशात महाराष्टÑ राज्याचे अन्न व औषध प्रशासन हे प्रशिक्षण देण्यात अग्रेसर ठरले आहे, अशी माहिती अन्न व औषध प्रशासन आयुक्त डॉ. पल्लवी दराडे यांनी दिली.

मुंबई कार्यशाळांची प्रशिक्षित
संख्या फूड
बिझनेस
आॅपरेटर्स
मुंबई २२ ३०८३
ठाणे ३१ २४२७
पुणे ३० ४९३१
नाशिक २४ १९५६
औरंगाबाद १५ ८६४
अमरावती १५ ८५२
नागपूर १२ १०८६
एकूण १४९ १५,१९९

Web Title: FDA provides food security lessons; Training for 15 thousand 99 hotel-restaurant, food-shop workers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Mumbaiमुंबई