माथाडी कामगारांचे आज मंत्रालयासमोर उपोषण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 18, 2018 05:28 AM2018-06-18T05:28:27+5:302018-06-18T05:28:27+5:30

माथाडी कामगारांशी संबंधित राज्य शासनाच्या कामगार, पणन व सहकार, उद्योग व अन्य खात्याअंतर्गत प्रलंबित मागण्यांसाठी सोमवारपासून बेमुदत उपोषण करण्याचा इशारा माथाडी कामगारांनी दिला आहे.

Fasting Against the Ministry of Mathadi Workers | माथाडी कामगारांचे आज मंत्रालयासमोर उपोषण

माथाडी कामगारांचे आज मंत्रालयासमोर उपोषण

Next

मुंबई : माथाडी कामगारांशी संबंधित राज्य शासनाच्या कामगार, पणन व सहकार, उद्योग व अन्य खात्याअंतर्गत प्रलंबित मागण्यांसाठी सोमवारपासून बेमुदत उपोषण करण्याचा इशारा माथाडी कामगारांनी दिला आहे. मंत्रालय येथील महात्मा गांधी यांच्या पुतळ््यासमोर माथाडी, ट्रान्सपोर्ट व जनरल कामगार युनियनचे नेते उपोषणासाठी बसणार आहेत. नवी मुंबई येथे माथाडी बोर्डाच्या टोळीचे मुकादम आणि उपमुकादम व कार्यकर्त्यांच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे.
माथाडी कामगारांसाठी सल्लागार समितीची पुनर्रचना करून अनुभवी कामगार नेत्यांना समितीवर सदस्य म्हणून नेमण्याची प्रमुख मागणी शासनाकडे अद्याप प्रलंबित आहे. शिवाय राज्यातील विविध माथाडी मंडळांच्या पुनर्रचना करून त्यावर माथाडी कामगारांच्या संघटनांच्या सदस्यांची सभासद संख्येनुसार सदस्य म्हणून नेमणूक करण्याची मागणीही संघटनेने याआधीच केलेली आहे. मात्र त्यावरही शासनाने अद्याप ठोस निर्णय घेतलेला नाही.
याआधी शासनाने राज्यातील ३६ माथाडी मंडळांचे एकच माथाडी मंडळ करण्याची घोषणा केली होती. मात्र त्याला सर्वच माथाडी कामगार संघटनांनी कडाडून विरोध केला होता. त्यानंतर आश्वासन देणाऱ्या सरकारने अद्याप एकच मंडळ करण्याचे प्रयत्न थांबवले नसल्याने कामगार संघटनांमधून तीव्र नाराजी व्यक्त करत उपोषणाचा निर्णय घेतला आहे.
>प्रमुख मागण्या
शासनाने तत्काळ माथाडी कामगारांचे प्रश्न सोडवून माथाडी मंडळाच्या कार्यालयीन सेवेत कामगारांच्या मुलांना प्राधान्य द्यावे, तसेच मंडळावर पूर्णवेळ अध्यक्ष व सचिवाची नेमणूक करण्याची मागणी संघटनेने केली आहे. माथाडी कायदा व कामगारांच्या हिताला बाधा आणणारे निर्णय रद्द केले नाही, तर सोमवारनंतर आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशाराही दिला आहे.

Web Title: Fasting Against the Ministry of Mathadi Workers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.