बांधावरच्या शेतकऱ्यांनी गिरवले मुंबईतील आयआयटीत शेतीचे धडे

By ऑनलाइन लोकमत | Published: February 22, 2019 06:17 AM2019-02-22T06:17:52+5:302019-02-22T06:18:16+5:30

कार्यशाळेचे आयोजन : शेतीला मिळणार तंत्रज्ञानाची जोड

Farmers of Bunda Grounded by Lessons in IITs in Mumbai | बांधावरच्या शेतकऱ्यांनी गिरवले मुंबईतील आयआयटीत शेतीचे धडे

बांधावरच्या शेतकऱ्यांनी गिरवले मुंबईतील आयआयटीत शेतीचे धडे

googlenewsNext

सीमा महांगडे 

मुंबई : आयआयटी बॉम्बेमध्ये शेतकºयांसाठी प्रशिक्षण वर्ग म्हटल्यावर अनेकांना आश्चर्य वाटेल. सोबतच शेतावरच्या बांधावर काम करणारा शेतकरी आयआयटीसारख्या ब्रँड व्हॅल्यू असणाºया संस्थेत कसले प्रशिक्षण घेणार, असा प्रश्नही पडणे स्वाभाविक आहे. मात्र ही किमया साधली आहे ती मुंबईच्या आयआयटीत आयोजित शेतकरी कार्यशाळेने. या कार्यशाळेमुळेच परभणीच्या शेतकºयांनी मुंबईत येऊन आयआयटीत प्रशिक्षण घेतले आहे.

राज्यातील शेतकºयाला मॅनेजमेंट डेव्हलपमेंट ते फार्मर डेव्हलपमेंट असा प्रवास करायला लावून पारंपरिक शेतीतून आधुनिक तंत्रज्ञानाच्या साहाय्याने शेती क्षेत्र विकसित करण्याच्या उद्देशाने मुंबई आयआयटीमध्ये १९ ते २१ फेब्रुवारी दरम्यान शेतकरी कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. आयआयटीमधील सितारा (सेंटर फॉर टेक्नॉलॉजी अल्टरनेटिव फॉर रुरल एरियाज) या विभागाने परभणीतील बांधावरच्या ३४ शेतकºयांच्या या कार्यशाळेत प्रशिक्षण मिळवून देण्यासाठी पुढाकार घेतला.
सततचा दुष्काळ व नापिकी यामुळे शेतकरी अडचणीत आहेत. अनेकदा शेतमाल साठविण्यास योग्य नसल्याने वाया जातो तर अनेकदा वन्यप्राण्यांच्या उपद्रवामुळेही नुकसान होते. हे लक्षात घेऊनच या शेतकºयांना योग्य मार्गदर्शन मिळावे यासाठी परभणीतील शेती सेवा ग्रुपने मुंबईतील आयआयटीशी यासंदर्भात पत्रव्यवहार केला.
याची दखल घेऊन आयआयटीच्या सितारा विभागामार्फत प्रथमच संस्थेत शेतकºयांसाठी शास्त्रज्ञांची कार्यशाळा आयोजित करण्यात आली. परभणीच्या पालम शेतकºयांना शेती करताना येणाºया अडचणी सोडविण्यासाठी शेतकरी व शास्त्रज्ञ यांच्यात संवाद साधला जाण्याचा हा अशा प्रकारचा राज्यातील पहिलाच प्रयोग असल्याचे या कार्यशाळेचे समन्वयक रमेश दुधाटे यांनी सांगितले.
या कार्यशाळेत सेंद्रिय शेती, हळद उत्पादक शेतकरी, रेशीम उत्पादक, खरीप उत्पादक, पशू संवर्धन व दुग्ध व्यवसाय, कृषी अभियांत्रिकी, उद्यान विद्या, रेशीम संशोधन, रोप वाटिका व कृषी पर्यटन, मका उत्पादक अशा विविध क्षेत्रांतील अनुभव असलेल्या तरुण ते वयस्कर ३४ शेतकरी सहभागी झाले होते. या कार्यशाळेत मिळालेल्या तंत्रज्ञानाचा वापर शेती उत्पादनात योग्य रीतीने करण्याचा मानस कार्यशाळेत सहभागी झालेल्या शेतकºयांनी व्यक्त केला.

...यासाठी मिळाले मार्गदर्शन
कार्यशाळेत शेतकरी व शेतमजूर यांची कार्यक्षमता आणि विकास, शेतमाळावरील प्रक्रिया करून उद्योगनिर्मिती, शेतीमधील भांडवल गुंतवणूक, विषमुक्त अन्न निर्माण करण्यासाठी आवश्यक संशोधन, शेती औजाराच्या निर्मितीबाबत संशोधन, सौरऊर्जेचा शेतीमध्ये किफायतशीर पद्धतीने वापर कसा होऊ शकेल? त्यासाठी आवश्यक पद्धती, शेतीसाठी पाणी वापर व त्याचे व्यवस्थापन, यासाठी आवश्यक नवीन तंत्रज्ञानाचीही माहिती आणि ओळख आदी विषयांवर मार्गदर्शन करण्यात आल्याची माहिती सितारा विभागाचे प्रमुख सतीश अग्निहोत्री यांनी दिली.

Web Title: Farmers of Bunda Grounded by Lessons in IITs in Mumbai

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.