शेतकरी व आदिवासींचा आज आझाद मैदानात झंझावात!
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 22, 2018 05:25 IST2018-11-22T05:24:39+5:302018-11-22T05:25:02+5:30
मुंबईकरांना त्रास होईल, म्हणून ठाण्याहून बुधवारी मुंबईच्या दिशेने निघालेला आदिवासी व शेतकऱ्यांचा मोर्चा अडवण्यासाठी पोलीस दबाव आणत आहेत, असा आरोप लोकसंघर्ष मोर्चाच्या महासचिव प्रतिभा शिंदे यांनी ‘लोकमत’शी बोलताना केला.

शेतकरी व आदिवासींचा आज आझाद मैदानात झंझावात!
मुंबई/ठाणे : मुंबईकरांना त्रास होईल, म्हणून ठाण्याहून बुधवारी मुंबईच्या दिशेने निघालेला आदिवासी व शेतकऱ्यांचा मोर्चा अडवण्यासाठी पोलीस दबाव आणत आहेत, असा आरोप लोकसंघर्ष मोर्चाच्या महासचिव प्रतिभा शिंदे यांनी ‘लोकमत’शी बोलताना केला. ठाण्याहून सकाळी निघालेले सुमारे २0 ते २५ हजार शेतकरी व आदिवासी रात्री साडेआठ वाजता मुंबईच्या सोमय्या मैदानावर पोहोचले.
उद्या, गुरूवारी सकाळी ८ वाजता मोर्चा आझाद मैदानाच्या दिशेने कूच करेल, असेही त्यांनी सांगितले. मागण्या मान्य होत नाहीत, तोपर्यंत मुंबई सोडणार नसल्याची प्रतिक्रियाही त्यांनी व्यक्त केली. शेतकºयांवरील अन्याय दूर होईपर्यंत आंदोलन सुरूच राहणार असल्याचा इशारा माजी न्यायमूर्ती बी.जी. कोळसेपाटील, बाबासाहेब आढाव आणि इतर पदाधिकाºयांनी दिला. मोर्च्यात ७0 टक्के महिला सहभागी असून, बहुसंख्य लोक अनवाणीच चालत आहेत.